हसन मुश्रीफांच्या XXXखोर वक्तव्यावर समरजितसिंह घाटगेंचा नाव न घेता हल्लाबोल

कोल्हापूर : आदरणीय शरदचंद्र पवार(political articles) साहेब यांनी त्यांना मुलासारखे प्रेम दिले, तर सुप्रियाताई मोठ्या भावाप्रमाणे राखी बांधत होत्या. ईडीपासून सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालकमंत्रिपदाच्या तुकड्यासाठी त्यांनी या कौटुंबिक नात्याचा सौदा केल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी नाव न घेता जोरदार पलटवार केला आहे.

पुण्यामध्ये समरजितसिंह घाटगे यांनी आयोजित केलेल्या कागल मतदारसंघातील नागरिकांच्या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार तोफ डागली होती. ईडी कागलमध्ये पोहोचल्यनंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला समोर आली होती, अशी सडकून टीका केली होती.

यानंतर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ(political articles) यांनी पातळी सोडून टीका करताना त्या XXXखोर प्रवृत्तीच्या लोकांच्या मेळाव्याला जायला नको होतं, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये सुद्धा उमटले. तसेच ईडीमुळे कोणामुळे आली याची माहिती सुप्रिया सुळे यांनी घ्यायला हवी होती, असेही हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.

आता समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता बोचरा वार केला आहे. समरजितसिंह म्हणाले की, त्यांना आता झोप येत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चुकीची वक्तव्य येत आहेत, अशी बोचरी टीका कागल येथे लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, काही दिवसापूर्वी जी काही चुकीचे वक्तव्य केले गेले. जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले यावर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा:

संजय राऊतांना 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड ही ठोठावला

लाडकी बहीण योजनेचा केवळ मतांसाठी जुगाड, भाजप आमदाराची मुक्ताफळं

मॅच दरम्यान कानपुर स्टेडियमवर होऊ शकतो अपघात, BCCI चं टेन्शन वाढलं