‘बिग बॉस १८’च्या घराची झलक पाहिलीत का? कसं दिसतंय घर

बिग बॉसच्या नव्या सीझनची अर्थात १८व्या सीझनची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या ६ ऑक्टोबर पासून म्हणजेच उद्यापासून प्रेक्षकांना कलर्स चॅनलवर हा शो(tv show) पाहता येणार आहे. ‘बिग बॉस १८’चं होस्टिंग सलमान खान करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्पर्धकांचे अनेक व्हिडिओ समोर येत असताना नुकताच ‘बिग बॉस १८’च्या घरातील पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी घराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तुमची डोळे दिपून जातील. यावेळी घरातील सर्वात मोठा बदल तुरुंगात करण्यात आला आहे. अत्यंत वेगळ्या आणि खास शैलीत आणि खास ठिकाणी कारागृह बांधण्यात आले आहे.

‘टाईम का तांडव’ अशी थीम बिग बॉसच्या घरातील आहे. ‘बिग बॉस १८’ (tv show)चे घर यावेळी लेणी आणि जुन्या किल्ल्यांसारखे दिसते. हे घर मागील वर्षांपेक्षा अधिक भव्यदिव्य स्वरूपात पाहायला मिळत आहे. यावेळी घरामध्ये गुप्त प्रवेशद्वार, गुप्त दरवाजे आणि काही ठिकाणे आहेत जी सहज दिसू शकत नाहीत. बागेच्या परिसरात प्रवेश केल्यावर, मोठे खांब आणि एक वाट घराच्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते, जे खूपच आकर्षक आहे. बाथरुमची थीम तुर्की हमाम्सपासून प्रेरित आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा ट्रोजन हॉर्स आहे, ज्यामध्ये बसण्यासाठी जागा आहे.

लिव्हिंग रूमची रचना खास शैलीत करण्यात आली आहे, हे पाहून प्रेक्षकांना जुन्या काळातील दिवस आठवतील. येथे बसण्याची जागा एका कोपऱ्यात ठेवली आहे, मध्यभागी एक मोठे डायनिंग टेबल ठेवले आहे. स्वयंपाकघर एखाद्या गुहेसारखे बनवण्यात आले आहे, तर बेडरूमचा परिसर लोकांना किल्ल्याची अनुभूती देईल. या भव्य घराची रचना करण्यासाठी 45 दिवस आणि सुमारे 200 कारागीर लागले. बिग बॉस ओटीटी 3 संपताच या घराचे काम सुरू झाले. प्रसिद्ध कला दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी हा सेट डिझाईन केलेला आहे.

‘बिग बॉस १८’ च्या स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर यावेळी शोमध्ये निया शर्मा, शहजाद धामी, शोएब इब्राहिम, नायरा बॅनर्जी, समीरा रेड्डी आणि शिल्पा शिरोडकर यांसारखे प्रसिद्ध चेहरे दिसणार असल्याची चर्चा आहे. रविवारी या शोचा भव्य प्रीमियर होणार आहे, ज्यामध्ये आणखी बरेच सेलिब्रिटी सहभागी म्हणून घरात प्रवेश करतील.

हेही वाचा:

राज्यातील ‘या’ कुटुंबांना मिळणार 7000 रुपये

उद्धव ठाकरेंना धक्का; शिवसेना गटाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा शिंदे गटात प्रवेश

कोल्हापुरात राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे; भाजपा कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये जोरदार झटापट