धबधब्याच्या काठावर उभा राहून गर्लफ्रेंडला प्रोपोज करत होता, तितक्यात पाय घसरला अन्…Video

सध्या पावसाळी वातावरणामुळे अनेक ठिकाणांचे सौंदर्य बहरून आले आहे, ज्यामुळे अनेकांचा या ऋतूमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनतो. यासहच अनेकजण या सुंदर वातावरणाचा फायदा घेत आपल्या प्रेयसीला प्रोपोज करण्याचा प्लॅन करतात. सुंदर वातावरण आणि बहरून आलेलं ठिकाण त्यांच्या प्रोपोज(proposing) प्लॅनसाठी सर्वोत्तम ठरतो. मात्र निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो क्रूरही आहे.

इथे कधी काय घडेल याची शाश्वती नाही आणि असाच एक प्रकार एका तरुणासोबत घडून आल्याचे नुकतेच दिसून आले आहे. वास्तविक तरुण धबधब्याच्या काठावर आपल्या प्रेयसीला प्रोपोज(proposing) करण्याचा प्लॅन करत होता मात्र निसार्ह त्याला असे करण्यापासून रोखतो आणि पुढे काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसून येते की, एक तरुण धबधब्याच्या मध्यभागी खडकाच्या काठावर उभा आहे. यावेळी त्याची प्रेयसी त्याच्यासमोर पाठ करून उभी आहे. मुलगी निसर्गाचे बारकाईने पाहत असते आणि याचवेळी मुलगा तिला हात लावून आपल्याकडे पाहायला सांगतो. मुलगी जशी वळते तो गुढघ्यावर बसून मुलीला प्रोपोज करू पाहतो मात्र निसर्गाला हे मान्य नसते.

मुलगा गुढघ्यावर बसणार तितक्यात पाण्याचा प्रवास त्याला आपल्यासोबत घेऊन जातो आणि तो धबधब्यावरून खाली पडतो. प्रेयसीला काही समजेल त्याआधीच मुलगा प्रवाहात वाहून जातो आणि त्याच्या प्रोपोजचे स्वप्न स्वप्नच बनून राहते. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि यात पुढे काय घडले हे व्हिडिओत स्पष्ट करण्यात आले नाही.

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @MarchUnofficial नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे हास्यास्पद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटत नाही की अशा गोष्टींची काही गरज आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अशा घटनांनंतरही लोक धडा घेत नाहीत. सर्वांना वाटते की हे माझ्यासोबत होऊ शकत नाही”.

हेही वाचा :

स्वस्तात पूर्ण होईल नेपाळची सफर; फक्त ‘या’ Travel Tips लक्षात ठेवा

आठवड्याच्या सुरुवातीला काय आहेत सोन्याचे भाव? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये झटपट बनवा खमंग कोथिंबीर पराठा, नाश्ता होईल पोटभर