नवी दिल्ली : देशभरातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस(country) होत आहे. त्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होताना दिसत आहे. असे असताना मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 21 हून अधिक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. राज्यातील दोन प्रमुख नद्यांना (नर्मदा आणि शिप्रा) पूरस्थिती आहे. उज्जैनमधील अनेक घाट आणि मंदिरे शिप्रा नदीत बुडाली आहेत.
हिमाचल प्रदेशात पावसामुळे 73 रस्ते बंद (country)झाले आहेत. यापैकी शिमल्यात 35, मंडीत 20, कांगडामध्ये 9, कुल्लूमध्ये 6, किन्नौरमध्ये 2 आणि उना जिल्ह्यात 1 बंद आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया येथे सरयू नदीत पिपा पूल वाहून गेला. लखीमपूर खेरी येथील नाल्यात 2 तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. राजस्थानच्या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये 27 जूनपासून पावसाळ्याच्या हंगामाच्या सुरुवातीपासून शुक्रवारपर्यंत (दि.23) पावसाशी संबंधित घटनांमध्ये 140 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि राज्याचे सुमारे 1212 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिझोराम, त्रिपुरा, बंगालचा गंगेचा प्रदेश, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारी कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
हेही वाचा:
दररोज सकाळी मिठाचे पाणी प्यायल्याचे फायदे: तज्ज्ञांच्या मते
कोयना धरणक्षेत्रात पावसाने वार्षिक सरासरी नोंदवली; धरणसाठ्यात मोठी वाढ
कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला! नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन