‘या’ क्रिकेटरवर लागलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) गोलंदाज (cricketer)यश दयाल सध्या त्याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे चर्चेत आहे. गाझियाबाद येथे राहणाऱ्या एका महिलेने मागच्या आठवड्यात यश दयालवर पाच वर्षे मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. इतकंच नव्हे तर ही तक्रार थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचली होती.

मात्र त्यानंतर मागच्या बुधवारी यशनेही आपली बाजू मांडत, प्रयागराजच्या पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. एवढ्यावरच न थांबता यशने अलाहाबाद हायकोर्टाचे दरवाजे ही ठोठावले होते. अलाहाबाद हायकोर्टातून आता यश दयालला दिलासा मिळाला आहे.

हायकोर्टाने यश दयालला दिलासा दिला असून त्याच्या अटकेवर रोक लावला आहे. न्यायालयाने कोणत्याही छळाच्या कारवाईवरही बंदी घातली आहे. न्यायालयाने यावर टिप्पणी करताना म्हटले की, केली आहे की दोघेही ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे लग्नाचे खोटे आश्वासन देऊन हे नाते निर्माण झाले असे म्हणता येणार नाही. तथापि, क्रिकेटपटू यश दयाल(cricketer) यांच्या याचिकेला राज्य सरकारने विरोध केला होता.

न्यायालयाने पीडित महिला नोटीस जारी करून उत्तर मागितलं आहे. तेथे हायकोर्टाने राज्य सरकारला सुद्धा याबाबत जबाब दाखल करण्यास सांगितलं आहे. याचिकाकर्ता यश दयाल यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील गौरव त्रिपाठी यांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडली. त्यांच्या मते, या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ते 6 आठवड्यांनी होईल. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायमूर्ती अनिल कुमार दशम यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

6 जुलै रोजी गाजियाबादच्या इंदिरापुरम पोलीस स्टेशन परिसरातील एका महिलेच्या तक्रारीवरून यश दयालवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता यश दयाल यांनी या एफआयआरला इलाहाबाद उच्च न्यायालयात याला आव्हान दिले आहे. गाझियाबादमध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर, यश दयाल यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

गाझियाबादमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर याबाबत तक्रार दाखल केली आहे. इंदिरापूरम सर्कल ऑफिसरकडे याची अधिकृत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये पीडित महिलेने स्पष्ट केलं आहे की, ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत(cricketer) रिलेशनशिपमध्ये होती. या काळात त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. तिने यशविरोधात व्हिडिओ कॉल्स, चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि फोटो यासारखे पुरावे सादर केले आहेत.

लैंगिक छळाच्या आरोपावर यश दयालने सुद्धा मौन सोडलं. त्यानं बुधवारी पोलीस स्थानकात तक्रार देत महिलेवर गंभीर आरोप करत म्हटले की, “ही मुलगी 2021 साली इंस्टाग्रामवर भेटली होती. तेव्हापासून आमचं बोलणं सुरू झालं. हळूहळू तिच्याकडून माझ्यावर तिचा विश्वास बसवण्याचा प्रयत्न सुरू झाला. तिने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उपचारासाठी लाखो रुपये मागितले. मी ती मदत केली, पण आजतागायत एक रुपयाही परत केला नाही.”

यशच्या म्हणण्यानुसार, केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर त्याचा iPhone आणि लॅपटॉप देखील तिने चोरून नेला, असा दावा त्याने आपल्या तीन पानी तक्रारीत केलाय. तसेच त्याने खुल्दाबाद पोलीस स्टेशन, प्रयागराज येथे तिला गुन्हेगारी स्वरूपात नोंदवून FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल

मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO