हिरोला टक्कर देणार होंडा! नवीन Shine 100 DX बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

होंडा कंपनीने भारतात शाईन १०० डीएक्स लॉन्च (Launch)केलीय. एंट्री-लेव्हल खरेदीदारांना लक्ष्य करत कंपनीने ही बाईक लॉन्च केलीय. ही बाईक हिरो स्प्लेंडर प्लसशी थेट स्पर्धा करेल.होंडाने नुकतीच एंट्री लेव्हल बाईक शाईन १००डीएक्स लाँन्च केलीय. कंपनीने या बाईकची किंमत देखील जाहीर केली आहे. ही बाईक थेट हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करणार आहे.

नवीन शाईनच्या आगमनाचा स्प्लेंडरच्या विक्रीवर परिणाम होईल का? हे पाहणे बाकी आहे. परंतु असे मानले जाते की नवीन मॉडेलच्या आगमनामुळे स्प्लेंडर प्लसच्या विक्रीवर फारसा फरक पडणार नाहीये काही मार्केट एक्सपर्टचं मत आहे. पण ही बाईक आपल्या किंमतीमुळे नवीन ग्राहकांना आकर्षित करू शकते.

होंडा शाईन १०० डीएक्स ९८.९८ सीसी सिंगल सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड ओबीडी२बी अनुरूप इंजिनने सुसज्ज आहे जे ५.४३ किलोवॅट आणि ८.०४ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. यात पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहेत. विशेष म्हणजे यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टम आहे जे ड्रम ब्रेक असूनही प्रभावीशाली आहे.

नवीन शाईन १००डीएक्समध्ये डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात तुम्हाला रिअल टाइम मायलेज आणि डिस्टेंस टू एम्प्टी यासारखे फीचर्स मिळतील(Launch). बाईकची डिझाईन चांगली आहे आणि तिची इंधन टाकी थोडी बोल्ड आहे. बाईकची सीट मऊ आणि आरामदायी आहे. दैनंदिन वापरासाठी ही एक चांगला पर्याय ठरू शकते. होंडाची नवीन शाईन १००डीएक्स देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक हिरो स्प्लेंडर प्लसशी स्पर्धा करेल,असं म्हटलं जात आहे.

हिरो स्प्लेंडर प्लसची किंमत ७९,००० रुपयांपासून सुरू होते. या बाईकमध्ये ९७.२ सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे जे ७.९ बीएचपी पॉवर आणि ८.०५ एनएम टॉर्क देते, याशिवाय इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्ससह येते. बाईकच्या आकर्षक किंमतीमुळे ग्राहक शोरुम बाहेर रांगा लावतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा :

दररोज ४०० रुपये गुंतवा अन् ७० लाख मिळवा, पोस्टाच्या या योजनेत मिळेल जबरदस्त परतावा
आशा भोसलेंनी विकला पुण्यातील आलिशान अपार्टमेंट; ४२% पेक्षा जास्त झाला नफा, मिळाले कोट्यवधी रुपये
शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही अशाप्रकारे चेक करा!