कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निवडणूक कोणतीही असो, ती जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी आचारसंहिता(code of conduct) लागू केली जाते. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली असून तिची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे असे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे आचारसंहिता जाहीर झाल्यापासून स्थानिक पोलीस यंत्रणांना अनेक अवैध? गोष्टी सापडू लागल्या आहेत. घातक शस्त्रे, रोख रक्कम, विविध प्रकारचे ड्रग्ज मद्याचा साठा, सोने,स्थानिक पोलीस यंत्रणांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी अशा प्रकारची कारवाई का होऊ शकत नाही? त्यासाठी आचारसंहितेचा समुहूर्त का शोधला जातो? असे काही प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केले जात आहेत.
आचारसंहिता(code of conduct) जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सोलापूरच्या दिशेने निघालेल्या एका कारची झडती घेतली असता एका बॅगेमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांची रोख रक्कम पोलिसांना सापडली. त्याच्या आधी एक दिवस उबाठा सेनेचे संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवाराकडे प्रत्येकी 15 कोटी रुपये पोहोचवण्यात आलेले आहेत. असा आरोप केला होता.
आता पाच कोटी रुपये सापडल्यानंतर हे 15 कोटी रुपयांपैकीच आहेत. पोलिसांनी फक्त पाच कोटी रुपये जप्त दाखवलेले आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या रोख रकमेचे गुड वाढत चालले असतानाच एका बांधकाम व्यावसायिकांनी हे पाच कोटी रुपये आपल्या मालकीचे असल्याचा दावा केला आहे. तसे त्यांनी पोलिसांकडे पुरावे ही सादर केले आहेत.
कोल्हापूरच्या पोलिसांनी पापाची चिक्की परिसरातून घातक शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे याचा परिसरात अशा प्रकारची शस्त्रे अर्थात कोयते, कुऱ्हाडी, रोजच विक्रीसाठी ठेवलेली असतात. ही हत्यारे शेतकऱ्यांच्यासाठी विक्रीसाठी ठेवलेली असतात. त्याची विक्री खुलेआमपणे होत असते. अशीच रस्त्यावर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
जेव्हा आचारसंहिता(Code of Conduct) जाहीर केलेली असते तेव्हा िल्हा दंडाधिकार्यांकडून बंदी आदेशही जाहीर केलेला असतो. या काळात कोणत्याही प्रकारची हत्यारे उघडपणे विकता येत नाहीत. हा शासन नियम हत्यारे विकणाऱ्यांना माहीत असतोच असे नाही. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी जप्त केलेली ही हत्यारे या नियमाच्या आधारे जप्त केलेली आहेत. म्हणजे हा गुन्हा तांत्रिक स्वरूपाचा मानावा लागेल.
गोवा मार्गे महाराष्ट्रात येणारे मद्य, हे कोल्हापूर मार्गे इतरत्र जात असते. गोवा बनावटीच्या दारूला गोव्याच्या बाहेर विक्रीसाठी बंदी आहे. त्यामुळे अशा प्रकारची दारू अधून मधून जप्त करण्याची कारवाई उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाते. आता तर आचारसंहिता असल्यामुळे अशा प्रकारचा दारूचा साठा या विभागाच्या भरारी पथकाला हमखास सापडतो. आणि तसा तो सापडलाही आहे.
आणखी कुठल्या एका शहरात तेथील पोलिसांनी 40 लाख रुपयांची रक्कम एका कारमधून जप्त केली आहे. आचारसंहिता काळात दहा लाख रुपयांच्या पुढे रक्कम कोणालाही बँकेतून काढता येत नाही आणि त्याची वाहतूकही केली जात नाही. तसा निवडणूक आयोगाचा आदेशच आहे. दहा लाखापेक्षा मोठी रक्कम न्यावयाची असेल तर स्थानिक प्रशासनाला त्याची पूर्वसूचना द्यायला हवी असे आदेशात म्हटले आहे. अर्थात जप्त करण्यात आलेल्या या रोख रकमांचा मूळ मालक पुढे येत असतो आणि जप्त केलेल्या रोख रकमेवर आपला हक्क सांगू लागतो.
पुणे पोलिसांच्या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एका वाहनातून 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या कारवाईचा संबंधित पोलिसांकडून मोठ्या गाजावाजा केला गेला आहे.
मात्र अशा प्रकारच्या सोन्याची वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने काही कंपन्यांच्या माध्यमातून नेहमीच केली जात असते. रोख रक्कम प्रचंड असेल तर त्याचीही सुरक्षित वाहतूक या कंपन्यांच्या कडून केली जाते. ही वाहने विशिष्ट प्रकारची असतात. वाहनामध्ये सुरक्षा रक्षक असतो. जीपीएस प्रणाली असते. अशा प्रकारचे सुरक्षा कवच असलेल्या वाहनांमधून सोन्याची चांदीची आणि रोख रकमेची वाहतूक केली जात असते. त्याचे रीतसर रेकॉर्ड वाहन चालकाकडे असते. अशी विशिष्ट वाहने रस्त्यावर अनेकदा पाहायला मिळतात.
सहकार नगर पोलिसांनी जप्त केलेले वाहन अशाच प्रकारचे आहे. या वाहनांमधून सोन्याची डिलिव्हरी केली जात होती. पोलिसांनी जप्त केलेले सोने हे वैध आहे, रीतसर आहे, त्याची कस्टम ड्युटी भरलेली आहे, असा दावा संबंधित कंपनीकडून पोलिसांकडे केला जाऊ शकतो. पोलिसांनी पकडलेले 138 कोटी रुपयांचे सोने पोलिसांनी जप्त केले असले तरी तो कारवाईचा एक तांत्रिक प्रकार आहे.
काही दिवसांपूर्वी कोकेन सारखा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केलेच पाहिजे. तथापि अशा प्रकारच्या अंमली पदार्थाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नसतो. पण ही कारवाई आचारसंहितेच्या काळातच झालेली आहे. आचारसंहितेच्या काळात बँक व्यवस्थापनाने सुद्धा खातेदारांनी किती रुपयांची रोख रक्कम बँकेतून काढायची याचे सुद्धा नियम केलेले असतात. अशावेळी करोडो रुपयांची रक्कम सापडते, याचेच आश्चर्य वाटते.
आचारसंहिता(code of conduct) जाहीर झाल्यानंतरच अशा प्रकारच्या कारवाया कशा काय केल्या जातात? त्याच्या आधी अशी कारवाई का होत नाही? याचा अर्थ निवडणुका जाहीर व्हायच्या आधी हे सर्व खुलेआमपणे सुरू होते काय? आणि त्याच्याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते आहे काय? असे अनेक प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केले जातात.
या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पोलिसांकडे नसतात ही वस्तुस्थिती आहे. इतके काटेकोरपणे सर्वच मतदारसंघात निवडणूक यंत्रणेचे, स्थानिक पोलिसांचे लक्ष असताना करोडो रुपयांची उलाढाल होत असते. उमेदवारांच्याकडून कोटीची उड्डाणे होत असतात.
हेही वाचा :
आजचे राशी भविष्य (26-10-2024) : astrology
‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्यास कमी वयात शरीरात जाणवतो सांधेदुखी
खलनायकाची इतकी ‘खतरनाक’ Acting! चित्रपट संपताच महिलेनं धो-धो धुतलं…