आजच्या डिजिटल युगात, आपण अनेकदा वेबसाइट्सवर(CAPTCHA) सर्फ करताना “I’m Not a Robot” असं एक छोटंसं चेकबॉक्स पाहतो. पाहायला अगदी साधं वाटणारं हे चेकबॉक्स, खरंतर एका जबरदस्त आणि गुंतागुंतीच्या सुरक्षा यंत्रणेचं प्रवेशद्वार असतं. हे यंत्रणा केवळ तुमच्या एका क्लिकवर विश्वास ठेवत नाही, तर तुमचं पूर्ण वर्तन बारकाईने पाहत असते. मग हे नेमकं काम कसं करतं आणि ते कशासाठी आहे, हे जाणून घेऊया.

हे चेकबॉक्स म्हणजे CAPTCHA नावाच्या यंत्रणेचा भाग आहे. हे यंत्रणा बॉट्स आणि खर्या वापरकर्त्यांमधील फरक ओळखण्यासाठी वापरली जाते. वेबसाईट्सना स्पॅम, फसवणूक, डेटा चोरणं अशा धोक्यांपासून वाचवण्यासाठी CAPTCHA एक महत्त्वाचा डिजिटल दरबारी आहे.तुम्ही “I’m Not a Robot” वर क्लिक करता, तेव्हा वाटतं की आपण फक्त एक बटन दाबलं, पण खरंतर तसं नसतं! हे यंत्रणा फक्त तुमच्या क्लिकवर नाही,(CAPTCHA) तर त्या आधी आणि नंतर तुम्ही काय केलं, त्यावरही बारकाईनं लक्ष ठेवते. जसं की….
- माउस हलवण्याची पद्धत: माणूस जेव्हा माउस हलवतो, तेव्हा थोडं इकडं-तिकडं, थांबून किंवा वाकडं तिकडं हलवतो. पण जर बॉट (संगणक प्रोग्रॅम) असेल, तर माउस अगदी सरळ रेषेत, नीटनेटका आणि वेगाने हलवतो. त्यावरून लक्षात येतं की समोर माणूस आहे की मशीन.
- क्लिक करताना घेतलेला वेळ: तुम्ही क्लिक करण्याआधी किती वेळ घेतलात? स्क्रोल करताना किती वेळ लावलात? हे सगळं पाहून यंत्रणा अंदाज लावते की तुम्ही खरोखर एखादं पेज वाचत होतात की फक्त स्क्रिप्ट वापरून अॅक्सेस घेतला जातोय.
- तुमचं डिव्हाइस आणि ब्राउजरची माहिती: तुम्ही कोणत्या ब्राउजरमधून आलेत, तुमचं IP अॅड्रेस काय आहे, स्क्रीनचं साईझ काय आहे, तुम्ही कोणत्या टाइम झोनमध्ये आहात, तुमच्याकडे कोणते प्लगइन्स आहेत ही सगळी माहिती एकत्र केली जाते.

जर तुम्ही Google खात्यात लॉग इन असाल, तर reCAPTCHA तुम्ही अलीकडे काय ब्राउझ केलं, हे पाहूनही तुमचं मानवी अस्तित्व ओळखू शकतं. (CAPTCHA)बऱ्याच वेळा यामुळे तुम्हाला चॅलेंज न मिळताच थेट अॅक्सेस मिळतो.
हेही वाचा :
रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…
जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा