केंद्र सरकारने अश्लील कंटेन्ट विरोधात मोठी एक्शन घेतली आहे.(earn) सरकारने एकता कपूर च्या OTT प्लॅटफॉर्म ALT Balaji सहित ULLU, Desiflix, Big Shots App सारख्या अन्य app ECf वेबसाईट्सवर अश्लील कंटेन्ट पसरवल्याच्या आरोपाखाली बंदी आणली आहे. या बंदीचा सर्वाधिक फटका एकता कपूरच्या Balaji Telefilms ला बसला आहे. आज या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. या बंदीचा किती परिणाम एकता कपूरच्या ALT Balaji वर बसेल आणि ही कंपनी किती मोठी आहे ? यात किती गुंतवणूक झालेली आहे.

Balaji Telefilms ने ALT Balaji ला Marinating Films सोबत मर्ज करुन आपल्या डिजीटल बिजनसला नवी दिशा दिली आहे. आधी केवळ सब्सक्रिप्शन-आधारित मॉडलवर चालणाऱ्या ALT Balaji ने आता हायब्रिड मॉडल आपलेसे केले आहे. ज्या एड-सपोर्टेड आणि सब्सक्रिप्शन दोन्ही रेव्हेन्यू स्ट्रीम्सचा समावेश आहे.या पावलाने प्लॅटफॉर्माचा वार्षिक कॅश बर्न 120-145 कोटी रुपयांवरुन घसरुन केवळ 35 लाख रुपये प्रति महिना राहिला आहे.
Balaji Telefilms टेलिव्हीजनद्वारे 367 उत्पन्न कमावते. तर चित्रपटांद्वारा 212 कोटींचा महसुल मिळतो. तर ALT Digitalचा रेव्हेन्यू 45.7 कोटी रुपये आहे. enterpriseappstoday.com च्या मते याचे 34.60 टक्के महिला युजर आणि 65.40 टक्के पुरुष युजर आहेत.ही कंपनी सत्तर हून अधिक देशात उपलब्ध आहे. याचे एकूण युजरपैकी 39.57 टक्के 18 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. कंपनीच्या OTT प्लॅटफॉर्म ALT Balaji ने आर्थिक वर्षात 2025 च्या चौथ्या तिमाहीत 3.29 लाख सब्सक्रिप्शन विकले.ज्यातील 1.73 लाख रिन्यूअल सामील आहेत.(earn) या दौरान कंपनीने 20 लाख एक्टिव्ह युजर नोंदवले आहेत.
ALT Balaji मुंबई स्थित एक ऑनलाईन व्हिडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.याची स्थापना साल 2015 मध्ये झाली होती. ही एक सब्सक्रिप्शन आधारित सेवा असून यात थ्रिलर, ड्रामा, कॉमेडी आणि लहान मुलांसाठीचे शोज सारखे कंटेन्ट विविध भाषेत ( मल्याळम, तामिळ, तेलगु, हिंदी आदी आहेत.

विशेष म्हणजे या कंपनीने आतापर्यंत कोणतीही फंडींग घेतलेली नाही. हिचे प्रतिस्पर्धी 1620 आहेत. ज्यात Netflix आणि Hulu सारख्या बड्या कंपन्या देखील सामील आहेत. ALT Balaji चा ऐप वेब Android आणि iOS अशा दोन्ही डिव्हाईसवर काम करते. हा ओरिजनल शोज आणि मल्टी जॉनर कंटेन्ट साठी ओळखता असतो.
Balaji Telefilms एक भारतीय कंपनी असून तिचा मालक एकता कपूर आणि शोभा कपूर आहे. ही कंपनी विविध भाषेत सोप ओपेरा, रियलिटी शो, कॉमेडी आणि गेम शो तयार करतात. ही कंपनी ALT Balaji नावाचा एक OTT प्लॅटफॉर्म देखील चालवते, जो एडल्टसाठी कंन्टेंट तयार करण्यासाठी ओळखला जातो. Balaji Telefilms एक लिस्टेड कंपनी असून ती मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे.
शेअरमध्ये घसरण
ALT Balaji कंपनीवर बंदी आल्याने शुक्रवारी Balaji Telefilms कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.शेअरचे भाव पाच टक्के घसरुन 93.47 रुपयांवर पोहचले आहेत. याशिवाय कंपनीने गेल्या एका आठवड्यात 3.64 निगेटिव्ह रिटर्न दिला आहे.
50 टक्के महसुल घसरला
कंपनीने अलिकडेच आपल्या चौथ्या तिमाहीचा रिझल्ट जाहीर केला होता. (earn)कंपनीच्या महसूलात 50 टक्क्यांपर्यत घसरला होता. कंपनीचा महसुल आर्थिक वर्षे 2025च्या चौथ्या तिमाहीत 135.11 कोटींवर घसरुन 66.25 कोटी राहिला आहे. तरीही या तिमाहीत PAT 94 कोटी रुपये राहीला जो एक वर्षा आधी 2.6 कोटी रुपये होता. कंपनी संपूर्ण वर्षात 453 कोटींचा रेव्हेन्यू नोंदवला आहे जो गेल्यावर्षी 625 कोटीपेक्षा कमी आहे.
हेही वाचा :
काँग्रेसचा मोठा नेता भाजपाच्या वाटेवर? ‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणेचा जनकच शिंदेंना साथ देणार?
लालपरीने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी!