जर तुम्ही स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज (Home loan)घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अशा बँकेकडून गृहकर्ज घ्यावे ज्याचे व्याजदर इतर बँकांपेक्षा कमी आहेत.प्रत्येकाचे स्वप्न असते की आपलं स्वतःचे घर असावे. पण आजकाल घरांचे दर गगनाला भिडले आहेत.अशा परिस्थितीत घर खरेदी करणे खूप कठीण होत चालले आहे. असे बरेच लोक आहेत जे आता बँकेकडून गृहकर्ज घेऊन घरे खरेदी करत आहेत. जर तुम्ही स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अशा बँकेकडून गृहकर्ज घ्यावे ज्याचे व्याजदर इतर बँकांपेक्षा कमी आहेत.

आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या गृहकर्जाबद्दल सांगणार आहोत. एसबीआय आपल्या ग्राहकांना खूप चांगल्या व्याजदराने गृहकर्ज देते.एसबीआय गृहकर्जाच्या (Home loan)व्याजदरांबद्दल बोलायचे झाले तर, एसबीआय आपल्या ग्राहकांना 7.50 टक्के सुरुवातीच्या व्याजदराने गृहकर्ज देते. कर्जाची रक्कम आणि सिबिल स्कोअरनुसार हा व्याजदर बदलू शकतो.
जर तुम्ही एसबीआयकडून 7 वर्षांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांचे गृहकर्ज घेत असाल आणि तुम्हाला हे कर्ज 7.50 टक्के व्याजदराने मिळत असेल, तर तुम्हाला दरमहा 15338 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही 7 वर्षांत बँकेला एकूण 12 88 415 रुपये भराल. यापैकी 2 88 415 रुपये फक्त तुमचे व्याज असणार आहे.
15338 रुपयांच्या मासिक ईएमआयनुसार, तुमचा पगार 30000 रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कर्जाची रक्कम निश्चित केल्यानंतर, ईएमआयनुसार तुमचे बजेट बनवा आणि तुमच्या बजेट आणि पगारानुसार ईएमआय सेट करा. ईएमआय कमी करण्यासाठी तुम्ही कालावधी वाढवू शकता.दरम्यान, सध्या घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना घर खरेदी करणं कठीण झालं आहे. दिवसिंदिवस या घरांच्या किंमती वाढतच आहेत. पण तुम्हाला जर घर घ्यायचे असेल आणि पैशांची कमतरता असेल तर तुम्ही एसबीआय च्या गृहकर्जाचा विचार करु शकता.
दरम्यान, सध्या विविध बँका तुम्हाला गृहकर्ज (Home loan)देतात. मात्र, ज्या बँकांचा व्याजदर कमी आहे, अशाच बँकांकडून तुम्ही कर्ज घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या दिवसेंदिवस घरांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
या शेतकऱ्यांना २००० नव्हे तर ७००० मिळाले; तुम्हाला आले का? वाचा सविस्तर
संतापजनक! शाळेत जात असतांना बळजबरीने गाडीत बसवलं, विनयभंग केला, पाईपने मारहाण केली
विराटसोबतच्या अफेअरचा विषय निघताच तमन्नानं सगळं सांगितलं… लग्नाबद्दल म्हणाली…