कनेक्शन धारकाच्या मृत्यूनंतर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर कसं कराल?

मालकाचा मृत्यू झाल्यावर गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर होतं, हे अनेकांना(connection) माहीत नसतं. पण काळजी करू नका! कनेक्शन बंद न होता, ते कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकतं. या प्रक्रियेसाठी काही सोप्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, जे आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत.

एका वेळी चूल आणि मातीच्या भांड्यांवर स्वयंपाक केला जायचा, पण आता प्रत्येक घरात गॅस सिलिंडर वापरला जातो. गॅस कनेक्शन ज्याच्या नावावर आहे, त्यालाच गॅस मिळतो. पण जर गॅस(connection) कनेक्शन धारकाचा मृत्यू झाला, तर ते कनेक्शन बंद होतं की दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला, या प्रश्नाचं उत्तर आणि कनेक्शन ट्रान्सफर करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊया.

मालकाच्या मृत्यूनंतर गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर होतं?
कनेक्शन धारकाच्या मृत्यूनंतर गॅस कनेक्शन दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होतं, पण त्यासाठी काही ठराविक कागदपत्रं आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया खूप सोपी आहे.

गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात:

  1. जवळच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधा: सर्वात आधी (connection) तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन संपर्क साधा.
  2. अर्ज करा: तिथे तुम्हाला एक अर्ज द्यावा लागेल, ज्यात तुम्ही कनेक्शन ट्रान्सफर करण्याची विनंती कराल.
  3. आवश्यक कागदपत्रं: अर्जासोबत तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रं जोडावी लागतील:
  4. जुन्या धारकाचा मृत्यू प्रमाणपत्र : ज्यांच्या नावावर कनेक्शन होतं, त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र.
  5. नवीन धारकाचा आयडी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यासारखे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा.
  6. नात्याचा पुरावा: नवीन धारकाचं जुन्या धारकाशी काय नातं आहे, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा.

सगळी कागदपत्रं जमा झाल्यावर, एजन्सी त्यांची पडताळणी करेल आणि काही दिवसांतच कनेक्शन नव्या नावावर ट्रान्सफर करेल.

गॅस कनेक्शन ट्रान्सफरसाठी काही शुल्क लागतं का?
गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी सहसा कोणतंही अतिरिक्त शुल्क लागत नाही. जर नवीन धारक कुटुंबातीलच सदस्य असेल, तर तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. एजन्सी फक्त कागदपत्रांची तपासणी करून नाव अपडेट करते.

पण, काही केसेसमध्ये, जुन्या कनेक्शनसोबतची रक्कम नवीन व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायची असल्यास किंवा नवीन सिलिंडर आणि रेग्युलेटर घ्यावे लागल्यास थोडे शुल्क लागू शकते. अशावेळी, एजन्सीने तुम्हाला त्याची पावती देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा :

श्रावणी सोमवार विशेष : मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा; पुण्यातील उमा महेश्वर मंदिर

फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक

आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! महादेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ, आजचे राशीभविष्य वाचा