सटाणा : नवीन शेतजमीन खरेदीसाठी पैसे न आणल्याचा राग मनात(angry) धरून एका महिलेला तिच्या पतीने विहिरीत ढकलल्याची घटना घडली. ही घटना बागलाण तालुक्यातील खिरमाणे येथे मंगळवारी (दि.13) घडली. याबाबत जायखेडा पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
तालुक्यातील फोपीर येथील माहेरवासीण (angry)असलेल्या योगीता देविदास भदाणे (वय ३५) असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या दाम्पत्याचा वाद विकोपाला गेल्याने पती देविदास महादू भदाणे याने पत्नी योगीताला शेतातील विहिरीत ढकलून दिल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.
दरम्यान, योगीताचा मृतदेह नामपूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. रुग्णालयात योगीताच्या नातेवाईकांसह फोपीर व खिरमाणे येथील महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली.
गर्दी आटोक्यात आणण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. योगीताच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना अटकेची मागणी नातेवाईकांकडून यावेळी करण्यात आली. मंगळवारी रात्री उशीरा जायखेडा पोलिसांनी योगीताच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या तिचा पती देविदास महादू भदाणे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
हेही वाचा :
आले मंत्री मंडळाच्या मना तेथे इच्छुकांचे काही चाले ना
स्वातंत्र्यदिनी आनंदवार्ता! सोन्याचे भाव उतरले, जाणून घ्या किमती
लाँग वीकेंडला रोमँटिक, कॉमेडी ते अॅक्शनपटाचा तडका; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?