सांगलीत भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; “मी मिनी पाकिस्तानात लढतोय”

सांगली : ”कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, या घोषणा बरोबरच आहेत. आम्हीही मिनी पाकिस्तानात लढतोय, पण मी चौकार मारलाय. मिरज विधानसभा(political updates) मतदारसंघातून चारवेळा निवडून आलोय.” असे वादग्रस्त वक्तव्य माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.

सुरेश खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघातून(political updates) निवडून येतात, त्यांच्या या वक्तव्याने मतदारसंघात नाराजी निर्माण झाली आहे. येथे मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये हिंदू एकता आंदोलन व हिंदू व्यवसाय बंधूतर्फे हिंदू गर्जना सभा झाली. मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे प्रमुख वक्ते होते.

खाडे म्हणाले, भारत हे हिंदू राष्ट्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पावले हिंदू राष्ट्राच्या दिशेने पडत आहेत. भाजप महायुतीला लोकसभेला अपयश आले. मात्र विधानसभेला बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, या नाऱ्यावर हिंदू एकत्र आले. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले. ज्यांनी साथ दिली नाही, त्यांचा कार्यक्रम करणार आहोत. ठोकायचे तिथे ठोकणार आणि रुजवायचे तिथे रुजवणार. असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी नितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू आहे. महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरजेतील दोन्ही कत्तलखाने तातडीने बंद झाले पाहिजेत, अशी सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर सभेत महापालिका आयुक्तांना केली. मिरज व कुपवाडमध्येही फिश मार्केट उभारू, प्रस्ताव द्या, तातडीने मंजूर करू, अशी घोषणाही त्यांनी केली.

नितेश राणे यांनीही मोठं विधान केल आहे. भारतात सर्वात जास्त हिंदू राहत असल्याने भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही. मी फक्त हिंदू मतावरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे, मी मतासाठी कोणत्याही मोहल्यात गेलो नव्हतो.

ज्या हिंदूंनी आम्हाला निवडून दिलं आहे त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे, असे मोठे विधान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी हिंदूचे ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, असे आक्षेपार्ह विधान नितेश राणेंनी केले आहे. राणेंनी विशाळगडाच्या उरुसाचा मुद्दा पुन्हा गिरवला आहे.

हेही वाचा :

शिंदे मुख्यमंत्री असतानाही नाराजच होते; हास्य हरवल्याच्या चर्चांवर फडणवीसांचं उत्तर!

Mumbai Local मध्ये मुलीने सर्व मर्यादा ओलांडल्या!  Viral Video

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान बिग बॉसच्या सेटवर चमकला चहल; श्रेयस अय्यरही झाला स्पॉट!