मी एकटा मुख्यमंत्री ज्याचं मुंबईत घर नाही…फडणवीसांचं भावनिक आवाहन

देवेंद्र फडणवीसने कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत. महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री (Chief Minister)आहे, ज्याचा मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझे घर नागपूर मध्येच आहे. असे म्हणत नागपूर दक्षिण पश्चिम या स्वतःच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मतदारांना भावनिक साद घातली आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा दक्षिण पश्चिम नागपूरच्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पाच वेळा सातत्याने तुम्ही आमदार म्हणून निवडून दिले. कधी विरोधी पक्षात काम केलं, तर कधी मुख्यमंत्री (Chief Minister)म्हणून काम केलं, विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं, उपमुख्यमंत्री म्हणून ही काम केले, मात्र या सर्व कारकिर्दीत मी महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांची दक्षिण पश्चिम नागपूरच्या मतदारांची मान उंच ठेवली. कधीही तुम्हाला खाली पाहायला लावलं नाही. जो आमदार तुम्ही निवडून दिला त्या आमदाराने तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वन वर आणून दाखवले, हे मी गर्वाने बोलू शकतो.

पंचवीस वर्ष विधानसभेत काम करतो आहे, त्याच्यापूर्वी नगरसेवक आणि महापौर ही राहिलो. मात्र माझ्या या राजकीय वाटचालीत नेहमी समाजासाठी काम करण्याचा तत्व ठेवलं. मी स्वतःचा विचार कधीच केला नाही. देवेंद्र फडणवीस ने कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचा उद्योग किंवा शिक्षण संस्था उभी केली नाही. मेडिकल कॉलेज उभारले नाही. स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही. फक्त तुमच्यासाठी काम केलं. म्हणून महाराष्ट्रात आजवर वीस मुख्यमंत्री झाले, या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे, ज्याचा मुंबईत स्वतःचे घर नाही. आजही माझा घर नागपूर मध्येच आहे आणि मला नागपूरकर असल्याचा गर्व आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी मुंबईतील मालवणी परिसरात सभा होणार आहे. याठिकाणी भाजपचे विनोद शेलार निवडणुकीच्या रिंगणात असून हा परिसर मुस्लीमबहुल आहे. राजे शहाजी मैदानावर आज रात्री 9 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोखंडवालामध्ये वर्सोवा आणि गोरेगाव विधानसभेसाठी रात्री 8 वाजता फडणवीसांची सभा होणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मालाड मालवणीत रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीवर भाजपकडून सातत्याने टीका केली जाते. धर्मांतर कायद्यासंदर्भात घोषणेनंतर मालाडमध्ये फडणवीसांच्या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ‘बटेंगे कटेंगे’वर फडणवीस पुन्हा बोलणार का?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा :

अमित शाहांवर टीका करताना राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान? MACCIA अध्यक्ष म्हणाले ‘आमच्या नादाला…’

रितेश देशमुखचा BJP वर निशाणा! म्हणाला, ‘मविआचं सरकार येणार

वाढदिवसाला BF बरोबर कॅफेत गेली, अश्लील Video व्हायरल झाला अन्