सध्या महाराष्ट्रात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.(heated) पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक पक्षांनी आणि संघटनांनी घेतली होती.त्यावरच आधारित आज मेळावा देखील पार पडला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांनी एकत्र येत हिंदी सक्तीविरोधात एकत्र पाऊल उचलंल आहे. पण अशातच आत एका अभिनेत्याने हिंदीचा मुद्दा उचलून धरला आहे .”मी मराठी बोलत नाही. दम असेल तर मला महाराष्ट्रातून काढून दाखवा’ असं वक्तव्य करत थेट चॅलेंजच केलं आहे. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

हे अभिनेते दिनेश लाल यादव असून ते भोजपुरी चित्रपटसृष्टीतील असून त्यांनी मराठी बोलण्यावर केलेल्या सक्तीवरून प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, “मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो.(heated) मी सर्वांना चॅलेंज देतो जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा,” अशा शब्दांमध्ये भोजपुरी अभिनेते व भाजप नेते दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांनी मराठी बोलावं या वादावर मत व्यक्त केले आहे. मीरा रोड येथील एका फास्ट फूड दुकानातील कर्मचाऱ्याला मराठी न बोलल्याबद्दल झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निरहुआ यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर थेट आव्हानात्मक भूमिका घेतली आहे.

वाराणसी येथे माध्यमांशी बोलताना दिनेश लाल यादव म्हणाले की, “मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा. तुम्ही गरिबांना का लक्ष्य करता? प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचे राजकारण करत आहेत” असा आरोपही त्यांनी केला. (heated)देशातील कोणत्याही भागात भाषेच्या नावावर द्वेष किंवा हिंसा होऊ नये.भारत हा विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो, आणि या विविधतेतूनच एकता साधली जाते” असेही ते म्हणाले.दिनेश लाल यादव यांच्या या मराठी बोलण्याच्या सक्तीवरील वादावरून वातावरण चिघळण्याची शक्यता जास्त आहे. आता यावर मनसे आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय