‘संयम ठेवला, पण अजूनही माझे 6,70,151 रुपये थकवलेत…’; ‘वादळवाट’ फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप

मराठीतील गाजलेली मालिका ‘वादळवाट’ फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर(director) पैसे थकवल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
‘संयम ठेवला, पण अजूनही माझे 6,70,151 रुपये थकवलेत…’; ‘वादळवाट’ फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप

मराठी अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस यांची 2019 मध्ये आलेली मालिका ‘हे मन बावरे’ विशेष गाजली. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली.(director) पण, या मालिकेन 2020 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, आज मालिका बंद होऊन कित्येक वर्ष लोटल्यानंतरही आजही दिग्दर्शकांनी पैसे न दिल्याचा आरोप निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर केला आहे. मालिकेत झळकलेले अभिनेते विजय पटवर्धन आणि मालिकेसाठी एक वर्ष दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित छिल्लारे यांनी म्हटलं आहे.

‘हे मन बावरे’ मालिकेसाठी एक वर्ष दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित छिल्लारे(director) यांनी इन्स्टाग्रामवर सविस्तर पोस्ट करुन आपली बाजू मांडली आहे. अमित यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे की, “पाच वर्षे संयम बाळगला, मंदार सरांचा आदर म्हणून गप्प होतो पण, आता मानसिक त्रास होतोय”. तसेच, पुढे बोलताना एकूण सहा लाख सत्तर हजार एकशे एकावन्न रुपयांचं मानधन थकवल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दिग्दर्शकानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीये.

नमस्कार.
मी अमित छल्लारे.
मार्च 2019 ते मार्च 2020 या कालावधीत मी मंदार देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. या एक वर्षात, वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला सिरिअल सोडावी लागली.

पण अजूनही माझे 6,70,151/- (सहा लाख सत्तर हजार, एकशे एकावन्न) रुपयांचे पेमेंट अडकले आहे.

या पाच वर्षांत मी संयम ठेवला,
अनेकदा संधी दिली,
प्रत्येक वेळी समजून घेतलं,
नेहमीच सपोर्ट केला,
पण मला फक्तं तारखा आणि आश्वासनं मिळत गेली.

मंदार देवस्थळी सर हे खूप सिनिअर आहेत.
त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो पण आता त्याच गोष्टींचा विचार करून मला खूप मानसिक त्रास होतोय आणि याआधीही झालाय. आता काय करायचं तुम्हीच सांगा सर.

आज हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुमच्या अडचणी समजून घेतल्या पण आता माझ्याही काही अडचणी आहेत, त्या तुम्ही समजून घ्याव्या. एकदा माझ्या बाजूनेही विचार व्हावा. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय न मिळणं माझ्यासाठी खुप त्रासदायक आहे.

आणि ह्या सगळ्यांत माझं काय चुकलं.?

मंदार देवस्थळी सर ज्या अडचणीत आहेत अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये.
लवकरच ते ह्यातून बाहेर पडो.
माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळो.

सर, तुम्ही लवकर ह्या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने काम करावं हिच सदिच्छा…

धन्यवाद

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा