मी तुमच्या शेतातला म्हसोबा; मला मत द्या… राजू शेट्टींची मतदारांना भावनिक साद!

“प्रत्येकाच्या शेतामध्ये म्हसोबा असतो. तो शेताची राखण करत असतो. त्यामुळे तुम्ही वर्षाला परडी(voters) सोडता. तसेच मी तुमच्या उसाची राखण करतो तुमच्या उसातला म्हसोबा मीच आहे. त्यामुळे मला मत द्यायचे आहे,” अशी भावनिक साद राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगलीच्या येडे मच्छिंद्र येथे प्रचार शुभारंभावेळी बोलत होते.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे(voters) नेते राजू शेट्टी निवडणूक लढवत आहेत. त्यांनी सांगलीच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भूमीत येऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गावातून बैलगाडी मधून त्याची रॅली काढण्यात आली. स्वतः राजू शेट्टी यांनी यावेळी बैलगाडी चालवली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी भावनिक आव्हान केले.

“ही निवडणूक माझी नाही तुमची आहे. कारण खोके बहाद्दूर बाजूला आहेत. दबावतंत्र आहे. गुन्हे दाखल होत आहे. पण या साऱ्यांना चितपट करून लोकसभेत मीच जाणार आहे. सगळ्यांनी मोबाईलवरून शिट्टीला मतदान करा असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

तसेच “माझा हात जन्माला आल्यापासून स्वछ आहे आणि मरेपर्यंत स्वछ राहणार आहे. कारण जनता मला निवडणूक लढवण्यासाठी पैसे देते. ज्या दिवशी तुमचा पैसा यायचा बंद होईल. त्या दिवशी मी निवडणूक लढणार नाही. असेही राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, हातकणंगले मतदार संघात महायुतीकडून धैर्यशिल माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून सत्यजित आबा पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हेही वाचा :

मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध! शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

सांगलीचा आखाडा तापला! सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची मापं काढू नयेत, संजयकाकांचा विशाल पाटलांवर प्रहार