राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध! शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रसारित(farmers) होत आहे. पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचा जाहीरनामा प्रकाशित झाला.

यामध्ये महिला,तरुण,तसेच कामगार यांच्यासह जतनिहाय जनगणना,शेतकऱ्यांना(farmers) शेतमालाला हमीभाव यांसह शाळांचा सेफ्टी ऑडिट यांच्यासह अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये युवक, महिला, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पायाभुत सुविधा, नागरी विकास, लोकशाही मुल्यांचं जतन आदी मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

⁠गॅसच्या किमती निश्चित करु, पेट्रोल डीझेलचे दर नियंत्रित करु. ⁠शासकीय रिक्त जागा भरु. ⁠महिलांचे आरक्षण ५० टक्के करण्याचा आग्रह धरु. जीएसटी मध्ये बदल करु. जीएसटी मध्ये राज्यांना अधिकार देऊ, ॲप्रेटीस विद्यार्थ्यांना ८५०० रुपये स्टायपेंड देऊ, स्पर्धा परीक्षाचे शुल्क माफ करु.. अशा मोठ्या घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आल्या आहेत.

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे..

 • महीलांना विधानसभा लोकसभेत आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार…
 • – ⁠शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग, हमीभाव, आयात निर्यात , कर्जमाफी याबाबतच्या निर्णयासांठी
 • – ⁠शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालणार..
 • – ⁠जातनिहाय जनगणाना करणार, त्यासाठी आग्रह धरु
 • – ⁠आरक्षणाची ५० टक्यांची अट बदलू
 • – ⁠खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण
 • – ⁠ज्येष्ठ नागरीकांसाठी आयोग स्थापन करणार
 • – ⁠अल्पसंख्यांकासाठी सच्चर आयोगाच्या शिफारशिंसाठी अंमलबजावणी
 • – ⁠शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतुद ६ टक्यांपर्यत करु
 • – ⁠शेती आणि शैक्षणिक वस्तुंवर शुन्य टक्के जीएसटी ठेवणार
 • – ⁠अग्निवीर योजना रद्द करणार

हेही वाचा :

लतादीदींचा स्वर म्हणजे आत्मा-परमात्म्याला जोडणारी तार!

मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं?

सांगलीचा आखाडा तापला! सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची मापं काढू नयेत, संजयकाकांचा विशाल पाटलांवर प्रहार