सांगली : दुपारी दोनची वेळ होती…हिराबाग वॉटर वर्कस परिसरातील रक्ताने माखलेल्या एकाचा मृतदेह नागरीकांना दिसला…समोर उभा असलेल्या बर्फ गोळ्याच्या गाड्यावर रक्ताचा सडा दिल्याने खून(murder) झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. ही बातमी वाऱ्यासारखी बातमी शहरात पसरली. एकामागून एक खूनाचा घटना घडत असल्याने नागरिकही मोठी गर्दी झाली.

पोलिसांचा फौजफाटाही आला…पोलिसही चक्रावले. तपास सुरू झाला. तेवढ्यात एका पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट आणि पोलिसांची धावाधाव थांबली. रामपाल रमखिलावर खेलायन उर्फ निशाद (वय ५५, मूळ रा. बेलापूर पोस्ट, नौकदवा जिल्हा, जवानपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. अहिल्यादेवळी होळकर चौक, संजयनगर) असे त्याचे बर्फ गोळा विक्रेत्याचे नाव.
मृतदेह तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला. त्याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. तोवर नातेवाईक जमा झाले. त्यांनाही धक्का बसला आणि कुटुंबियांना हंबरडा फोडला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत शहर पोलिसांत नोंद केली. सायंकाळी उशीरा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अधिक माहिती अशी, की शहरात चार दिवसांपूर्वी एकाचा खून करण्यात आला. त्यानंतर काल आयर्वीन पुलाजवळ पत्नीचा गळा चिरून पतीने खून केला. एकामागून एक खुनाच्या घटना शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने खळबळ उडाली होती. तेवढ्यात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास खुन (murder)झाल्याची बातमी धडकली. पोलिसांनी अक्षरशः डोक्याला हात लावत घटनास्थळ गाठले. रक्ताने माखलेला रामपाल तेथे पडला होते. खून झाल्यासारखी प्रथमदर्शी दिसून आले. अखेर सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने घटनेचा उलघडा झाला.
रामपाल हे मूळचा उत्तरप्रदेशमधील असला तरी गेल्या वीस वर्षांपासून ते सांगलीत वास्तव्यास आहे. त्यांचे दोन भाऊ देखील बर्फ गोळा विक्री करतात. ते आज सकाळी जेवण करून गोळा विक्रीसाठी बाहेर पडले होते. काळाने त्यांचावर घाला घातला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी उशीरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची नोंद शहर पोलिस ठाण्यात आहे.
मृत रामपाल यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या पँटच्या खिशांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे बटणांचा मोबाईल मिळून आला. पोलिसांनी तपासणी केली असाता काल रात्री दोन वेळा डायल ११२ ला कॉल केल्याचे समोर आले.
हेही वाचा :
माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट
काळजी घ्या २ दिवस उष्णतेचा इशारा राज्यभरात IMD कडून अलर्ट
लग्नाच्या 37 वर्षानंतर अभिनेता गोविंदा आणि सुनिता घटस्फोट घेणार?