कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. हातकणंगले परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस (it rain) झाल्याचे वृत्त आहे. हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला .वादळी वारा, धडकी भरवणारा विजांचा कडकडाट होत मुसळधार पाऊस झाला.
वीज गेल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले.कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर उकाडा जाणवत होता ल. सायंकाळी जोरदार वारे वाहू लागले होते. पाऊस (it rain) येण्याची चिन्हे दिसू लागली होती. जिल्हा प्रशासनाने पावसापासून सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने झोडपायला सुरू केले. काही काळातच परिसर जलमय झाला. हातकणंगले तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.
अशातच वीज गेल्यामुळे पंचायत झाली.इचलकरंजी शहरालाही पावसाने झोडपले. वादळी वारा, धडकी भरवणारा विजांचा कडकडाट होत मुसळधार पाऊस झाला. वीज गेल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. शिरोळ तालुक्यात अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला. कागल तालुक्यात पावसाने हजेरी लावली. लिंगनूर दुमाला येथे पावसामुळे दुकानांसमोर लावलेले फलक उडून गेले.
हेही वाचा :
मोठी बातमी! दिल्लीतील दोन सरकारी हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल
चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?