इचलकरंजीचा होतोय बिहार, २२ वर्षीय अमोलला रस्त्यात अडवलं अन्; रेकॉर्डवरील गुन्हेगाराने जे केलं ते भयानक…

आसरानगर परिसरात जुन्या वादातून दोन संशयितांनी भरदिवसा(stopped)थरार उडवत २२ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे या आरोपींपैकी एकावर आधीपासून नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद असूनही तो खुलेआम फिरत होता. रस्त्यावर अडवून दगडांनी डोक्यावर आणि चेहऱ्यावर केलेल्या जबर मारहाणीमुळे पृथ्वीराज विजय जाधव वय २२, रा. शहापूर हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेतानाही आरोपींनी पुन्हा अडवून मारहाण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ही घटना मंगळवारी ता. २४ दुपारी चारच्या सुमारास आसरानगर बसस्टॉपजवळ घडली.

अजय भोसले, पृथ्वीराज जाधव आणि राहुल होसमणी हे तिघे (stopped)दुचाकीवरून जात असताना संशयित आरोपी रविकांत चंद्रकांत घोलकर वय ३२ आणि अमोल ऊर्फ रवींद्र शिवाजी कामते वय २५, रा. आसरानगर यांनी त्यांना आडवले. “आज पृथ्वीराजला जिवंत ठेवणार नाही” असे म्हणत दोघांनी दगड उचलून त्याच्यावर तुफान हल्ला चढवला. डोक्यात व चेहऱ्यावर दगड लागल्यामुळे पृथ्वीराज जागेवरच कोसळला.

जखमी अवस्थेत मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बिरदेव मंदिराजवळ संशयितांनी पुन्हा त्यांना अडवून पृथ्वीराजवर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला.(stopped) सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.गावभाग पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या अमोल ऊर्फ रवींद्र कामते याच्यावर याआधीच शहापूर व गावभाग पोलिस ठाण्यांमध्ये मारहाण, दरोडा, धमकी, चोरी, शस्त्रबंदी उल्लंघन यांसह नऊ गुन्हे दाखल आहेत.या घटनेने इचलकरंजी शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

हेही वाचा :

उद्या शुक्रवारी बंद राहणार सर्व बँका; जाणून घ्या RBI ने 27 जूनला का दिली आहे सुट्टी

NHAI वर दुचाकी वाहनांनाही द्यावा लागणार टोल, १५ जुलैपासून लागू होणार नियम

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका