इचलकरंजी; सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी माणुसकी फाउंडेशनचे निवेदन!

इचलकरंजी: शहरातील तसेच आसपासच्या गावातील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना (students)आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते. याच पार्श्वभूमीवर माणुसकी फाउंडेशनने व्यंकटेश महाविद्यालय व गोविंदराव ज्युनिअर कॉलेज यांना निवेदन देऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी मागणी केली आहे.

अकॅडमींमध्ये घेतली जाणारी भरमसाठ फी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी नसल्यामुळे, त्यांना पुढील शिक्षणासाठी अडचणी निर्माण होतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माणुसकी फाउंडेशन समाजातील अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांनी वरील मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माणुसकी फाउंडेशनने व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने यांना वाढीव तुकडीची मागणी केली आहे. यामुळे शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे फाउंडेशनचे रवी जावळे यांनी सांगितले. तसेच, बी. कॉम विद्यार्थी माणुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी मनोज चौगुले, रंकेत रॉय, चेतन चव्हाण, प्रथमेश इंदुलकर, मधुर पाटील, ओंकार सुतार, सौरभ चव्हाण, प्रवीण मंगलेकर, कृष्णा इंगळे, सुमित पाटील, अभी शेटके, ऋषिकेश सातपुते, सागर भोसले, सुमित प्रमोद पाटील, प्रतीक पाटील, नितीन चौगुले आणि प्रवेशासाठी आलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

हेही वाचा :

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका नव्या वळणावर

लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप

सावधान! पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर…