कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशाचे विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे (political)राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दलची भूमिका कायमच वादात राहिली आहे, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी सावरकर यांच्या बद्दल मांडले जाणारे संकुचित विचार हे आपणा समोरचे मोठे आव्हान असल्याचे सांगून तमाम सावरकरवादी मंडळींना सुखद धक्का दिला आहे. “फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स”या त्यांच्या आत्मचरित्रात सावरकरांच्या प्रती त्यांनी एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त केली आहे. सावरकरांच्या बद्दल आपली निखळ मते व्यक्त करणारे सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्रातले देश पातळीवरचे पहिले नेते आहेत कि, त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.
कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची”माफी वीर”अशी संभावना सातत्याने केली आहे. श्रीमती इंदिराजी गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर(political) यांना योद्धा अशा शब्दात सन्मानित केले असताना त्यांचे नातू राहुल गांधी हे मात्र सावरकरांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सावरकरांच्या कार्याचे विविध पैलू दाखवतात आणि सावरकरांबद्दल मांडल्या जाणाऱ्या संकुचित विचाराबद्दल खंत व्यक्त करतात.
“भगवा दहशतवाद”असे काही वर्षांपूर्वी विधान करणाऱ्या आणि हिंदूंची नाराजी ओढवून घेणाऱ्या सुशील कुमार शिंदे यांच्याकडून सावरकरांचा लिखित सन्मान केला गेला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सावरकर या विषयावर स्वतंत्र चाप्टर लिहिला आहे.
जातीअंताच्या लढाईत, सामाजिक समतेच्या लढाईत, दलित उद्धाराच्या चळवळीत सावरकरांना मोठी किंमत मोजावी लागली. त्यांच्या हिंदुत्ववादावर कायम घसरणाऱ्या, टीका करणाऱ्यांना त्यांच्यातील विचारवंत, प्रखर वैज्ञानिक का दिसत नाही? असा सवाल उपस्थित करणाऱ्या सुशील कुमार शिंदे यांनी सावरकरांना हिंदुत्वाच्या चौकटीत पाहणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे. अशी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेण्याचे धाडस शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही करता आलेले नाही.
मध्यंतरी सावरकर यांनी लिहिलेल्या “इतिहासातील सहा सोनेरी पाने”या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांचा का उल्लेख नाही असा प्रश्न उपस्थित करून काही राजकारणी मंडळींनी मध्यंतरी वादंग वाजवले होते. तेव्हा शरद पवार यांनी सावरकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असा उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर स्वतंत्र ग्रंथ लिहिणारे, काव्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना महाराष्ट्रातील काही वाचाळवीर शिवाजी महाराजांचा द्वेष करणारे म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
काही वर्षांपूर्वी संसदेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैल चित्र लावण्यास काही जणांनी अप्रत्यक्ष विरोध केला होता.
तथापि हा विरोध डावलून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा संसदेमध्ये लावण्यात आली. सावरकर यांच्या बद्दल काँग्रेसचे राहुल गांधी हे सातत्याने वादग्रस्त विधाने करतात मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्याचा प्रतिवाद केला जात नाही. याबद्दल त्यांना जेव्हा जेव्हा विचारले तेव्हा तेव्हा त्यांनी”तर मग सावरकरांना भारतरत्न का देत नाही?”असा प्रति सवाल करून स्वतःचा बचाव केलेला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात(political) प्रचार दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयी भूमिके बद्दल काँग्रेसला चांगलेच फटकारले होते. काँग्रेसमध्ये सुरुवातीला मनी अय्यर हे सावरकर विरोधी वारंवार मते मांडायचे. इतकेच नाही तर त्यांनी मंत्री असताना अंदमान येथील सावरकर यांच्या विषयी लिहिलेली कोनशिला उखडून टाकली होती. त्यानंतर राहुल गांधी हे सावरकर विरोधी भूमिका वारंवार मांडू लागले. तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची या विषयावर नेहमीच पंचाईत झालेली दिसली.
या एकूण पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशी अनेकविध पदे भूषविणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी आधाराची भूमिका घेतलेली आहे. सावरकर यांच्या बद्दल संकुचित विचार मांडले जातात हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान असल्याचे ते स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात सांगतात. एकूणच स्वातंत्र्यवीर सावरकर सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला कळले आहेत मात्र महाराष्ट्रात असे काही ज्येष्ठ राजकीय नेते आहेत की त्यांना सावरकर नीटपणे कळालेले नाहीत.
हेही वाचा:
आज ‘या’ राशींवर राहणार देवी ब्रह्मचारिणीची कृपा!
दिवाळी गिफ्ट! रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
गुगलचे भारतासाठी मोठे पाऊल! भारतात स्वच्छ ऊर्जा क्षमता वाढविण्यासाठी क्लीनमॅक्सबरोबर केली भागीदारी