नवरा बायकोचे भांडणं होतात? मग घरात हे खास झाड लावाच

तुम्ही अनेकदा अनुभव घेतला असेल, की बऱ्याचवेळेला काही कारण नसताना घरात भांडणं होतात,(fights)वादविवाद होतात. त्यामुळे घर अशांत राहातं. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरातील व्यक्तींची आपसात भांडणं होतातं. या सर्वांमुळे घरातील वातावरण बिघडतं. जर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण शांत ठेवायचं असेल, छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण टाळायची असतील तर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत, त्यापैकीच एका उपयाची आज आपण माहिती घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, ती जर तुम्ही तुमच्या घरात लावली तर त्यांच्या प्रभावामुळे तुमच्या घरात वातावरण शांत राहातं, घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, त्यातील एका झाडाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

जर तुमच्याही घरात सतत भांडणं होत असतील, घरात शांतता टिकत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोगऱ्याचं झाड लावू शकता. मात्र फक्त मोगऱ्याचं झाड लावून काम होतं असं नाही,(fights) तर तुम्ही मोगऱ्याचं झाडं तुमच्या घरात ज्या दिशेला ठेवणार असाल ती दिशा देखील योग्य पाहिजे, तसेच मोगऱ्याच्या झाडाची काळजी देखील योग्य पद्धतीनं घेतली गेली पाहिजे.मोगरा हे एक असं झाडं आहे, ज्याच्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो, मोगऱ्याच्या फुलांपासून जो सुगंध येतो तो घरातील नकात्माकता दूर करतो, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरातील वातावरण प्रसन्न राहातं. ज्योतिषशास्त्रामध्ये मोगऱ्याला सौभाग्याचं प्रतिक मानलं गेलं आहे. मोगरा घरामध्ये ऊर्जा संतुलनाचं काम करतो.

मोगऱ्याचा संबंध हा शुक्र ग्रह आणि चंद्रशी आहे, असं मानलं जातं. (fights)शुक्र हा ग्रह प्रेम, आकर्षण आणि ऐश्वर्याचं प्रतिक आहे, तर दुसरीकडे चंद्र शांतीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे घरामध्ये मोगऱ्याचं झाडं लावणं शुभ मानलं जातं. मोगऱ्यामुळे घरात शांती टिकते आणि भांडणं होत नाहीत असं मानलं जातं. मोगऱ्याचं हे झाडं घरातील उत्तर -पश्चिम दिशाला लावणं शुभ मानलं जातं.

हेही वाचा :

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर

कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर

‘लग्नात अक्षतांऐवजी वाटल्या झाडांच्या बिया’; उंडाळ्यात पाटील कुटुंबीयांचा उपक्रम, पर्यावरण संवर्धनाचा संदेश