जर तुमचा मासिक पगार 30 हजार रुपये असेल आणि या पगारात(salary) जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

आपली स्वतःची कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचेच स्वप्न असते.(salary) हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण आपल्या मासिक पगारानुसार बजेट आखात असतात. यातही ग्राहक त्या कार्सना जास्त प्राधान्य देतात ज्या बजेट फ्रेंडली असतात. मात्र, काही वेळेस पगार कमी असल्याने कार खरेदी करण्याचा प्लॅन कॅन्सल होतो. आता मात्र याबाबत टेन्शन घेण्याची गरज नाही.
भारतीय बाजारपेठेत स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या कार्सना मोठी मागणी आहे.(salary) बऱ्याचदा बजेटअभावी लोक कार खरेदी करू शकत नाहीत. हीच बाब लक्षात घेत, आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेऊयात जी तुमच्या 30000 पगारात सुद्धा फिट होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही ही कार १ लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर देखील खरेदी करू शकता.
टोयोटा किर्लोस्कर मोटरची July 2025 मध्ये बंपर विक्री, कंपनी झाली मालामाल

कसा असेल डाउन पेमेंटचा हिशोब?
ही कार दुसरी तिसरी कोणी नसून Renault Kwid आहे, ज्याच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे. त्याच वेळी, राजधानी दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 5.24 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, आता जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन ही कार खरेदी केली तर तुम्हाला बँकेकडून 4.24 लाख रुपयांचे लोन मिळेल.
जर तुम्ही ही कार 5 वर्षांसाठी घेतली तर 9 टक्के व्याजदराने तुम्हाला दरमहा 9 हजार रुपये हप्ता भरावा लागेल. अशा प्रकारे, रेनॉल्ट क्विडच्या 60 हप्त्यांच्या खरेदीवर तुम्हाला सुमारे 1.25 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.
रेनॉल्ट क्विडचे स्पेसिफिकेशन
कंपनीने रेनॉल्ट क्विड 1.0 आरएक्सई व्हेरिएंटमध्ये 999 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 67 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 9 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. कंपनीच्या मते, ही कार प्रति लिटर सुमारे 21 किमी मायलेज देते. यामध्ये 28 लिटरचे फ्युएल टॅंक देखील आहे.

Honda कडून पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टिझर लाँच, ‘या’ दिवशी होणार सादर
फीचर्सनुसार, कंपनीने रेनॉल्ट क्विडमध्ये पॉवर स्टीअरिंग, लेन चेंज इंडिकेटर, टॅकोमीटर, रियर स्पॉयलर, एलईडी डीआरएल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्जसह ट्रॅक्शन कंट्रोल असे अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. बाजारात ही कार Maruti Suzuki Alto K10 ला थेट आव्हान देते.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष