केवळ 1 गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास, वर्षानुवर्ष टिकेल प्रेम

जेव्हा जेव्हा दोन अनोळखी व्यक्ती संपर्कात येतात आणि एकमेकांकडे(strangers)आकर्षित होतात तेव्हा त्यांना प्रथम त्या व्यक्तीचा चांगुलपणा लक्षात येतो. ते त्याच्या गुणांनी इतके प्रभावित होतात की त्यांना त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा असतो. पण कधीकधी काही वर्षांनी अशा नात्यांमध्येही एक वळण येते आणि दोघांचेही मार्ग वेगळे होतात. यामागे एक छोटेसे कारण असते, जे वेळीच नियंत्रित केले नाही तर ते खूप मोठे रूप धारण करते. गौर गोपालदास यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितले होते आणि जर नाते जास्त काळ टिकायचे असेल तर काय करावे हे स्पष्ट केले होते, तुम्हालाही तुमचं नातं दीर्घकाळ टिकावं वाटत असेल तर त्यासाठी काय करावे जाणून घ्या

गुरु गोपाल दास म्हणतात की जेव्हा आपण एखाद्याच्या जवळ असतो आणि त्याच्यासोबत बराच काळ असतो तेव्हा आपण त्याच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीकडे अधिक खोलवर पाहण्यास सुरुवात करतो. (strangers)दीर्घकाळ एकत्र असल्यावर अनेकदा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या चुका दिसायला सुरूवात होते आणि मग भांडणं अधिकाधिक वाढत जातात. कारण आपण संवाद साधायच्याऐवजी आणि आपल्या जोडीदाराचं ऐकून घेण्याआधीच त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात करतो.

गौर गोपाल दास यांनी पुढे स्पष्ट केले की आपण जितके जास्त इतरांच्या कमतरता किंवा चुकांवर लक्ष केंद्रित करू लागतो तितकेच आपल्याला त्या व्यक्तीबाबत नापसंती वाढू लागते. जर तुमचे एखाद्याशी जवळचे नाते असेल तर त्यांच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करायला शिका, जेणेकरून आपलं नातं टिकायला अधिक मदत मिळेल

आपला मुद्दा पुढे नेत गोपाल दास म्हणाले की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणाऱ्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष करू शकत नसाल तर त्याचा सामना करा. त्याच्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करा. ही पद्धत पुन्हा एकदा तुमच्या मनात आणि तुमच्या नातेसंबंधातल्या गोष्टी निश्चित करण्यास सुरुवात करेल. यामुळे तुमच्या मनातील राग कमी होऊन समोरच्या व्यक्तीचे दोष स्वीकारायला मदत करेल

गुरु गोपाल दास यांनी सांगितलेले १००% खरे आहे. पण, जेव्हा पती-पत्नीमधील नात्याचा विचार केला जातो तेव्हा प्रत्येक वेळी गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही. अशा परिस्थितीत, या परिस्थितीला तोंड देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बोलणे.संवाद ही नात्याची गुरुकिल्ली आहे, जी सर्वात मोठ्या समस्या देखील सोडवू शकते. (strangers)त्यामुळे कोणतंही भांडण असेल तर अर्धवट सोडू नका. त्यावर बोला, तोडगा काढा, मार्ग काढा, तरच नातं टिकू शकेल. एकमेकांशी भांडलात तरीही त्यासाठी बोलणं महत्त्वाचं आहे. बोललाच नाहीत तर नातं टिकणं अत्यंत कठीण आहे. कारण कोणत्याही भांडणातून संवादाशिवाय मार्ग निघूच शकत नाही

हेही वाचा :

“मराठी”च्या मोर्चाला प्रतिबंध पोलीस प्रशासनाचा दुजाभाव

कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral

रिलसाठी पालकांनीच चिमुकलीचा जीव घातला धोक्यात; धरणाच्या रेलिंगवर बसवले अन्…, Video Viral