शरीरात जर ‘ही’ लक्षणं दिसली तर समजा तुम्ही फीट आहात; पाहा तुम्ही निरोगी आहात की नाही

प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण फीट आणि फाईन राहिलं पाहिजे.(Everyone) आपल्याला कोणतेही आजार नसावेत असं प्रत्येकाला वाटतं. कोणतेही आजार किंवा समस्या असतील तर शरीर तुम्हाला त्याचे संकेत देतं. त्याचप्रमाणे तुम्ही फीट आहात याचेही संकेत शरीर तुम्हाला देतं.निरोगी असणं म्हणजे केवळ चांगलं वाटणं नाही. तर आपल्या शरीरातून वेळोवेळी सूक्ष्म संकेतही मिळत असतात की सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

लघवीचा रंग
आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा संकेत म्हणजे लघवीचा रंग. पांढरट किंवा फिकट पिवळा लघवीचा रंग असल्यास की शरीर पूर्णपणे हायड्रेट आहे. याचाच अर्थ तुमची किडनी खूप चांगलं कार्य करतेय. लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर त्या व्यक्तींमध्ये डिहायड्रेशन किंवा अन्य आरोग्यविषयक समस्या असू शकतात.

नियमित शौचास जाणं
दररोज किंवा एक-दोन दिवसांमध्ये एकदा वेळा सहज शौचास जावं लागणं हे पचनक्रियेच्या चांगल्या कार्यक्षमतेचं लक्षण आहे. शौचावेळी कोणताही त्रास होत असणं हे तुमचा आहार संतुलित आहे असल्याचं लक्षण आहे.
मऊ ओठ
ओठांचं आरोग्य आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि पोषणाच्या स्थितीचं संकेत देतं. कोरडे, फाटलेले ओठ हे डिहायड्रेशन किंवा जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचं सांगतात.

महिलांना नियमित मासिक पाळी
स्त्रियांसाठी नियमित मासिक पाळी येणं हे चांगल्या (Everyone)आरोग्याचं एक लक्षण आहे. जर पाळी वेळेवर येते आणि फारशी वेदना देत नसेल तर हार्मोन्स संतुलित आहेत आणि प्रजननसंस्था योग्य प्रकारे कार्य करत हे दर्शवते.

जखमा लवकर भरून येणं
आपल्या शरीरावर जर जखमा, खरचटणं, फोडं या घटना लवकर भरून येत असतील तर ती एक चांगली प्रतिकारशक्ती असल्याचे संकेत आहेत. जखमा लवकर न भरल्यास(Everyone) जीवनसत्त्वांची कमतरता, रक्ताभिसरणातील समस्या किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याचं लक्षण असतं.

हेही वाचा :