पांढऱ्या पारंपारिक तांदळाची खप भारतात जास्त आहे.(types)परंतू अनेक हेल्थ एक्सपर्टच्या मते हा तांदूळ आरोग्यास चांगला नाही त्याचा वापर कमी करावा. त्यामागे कारण सांगितले जाते की या पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. तो जवळपास 70 ते 90 च्या आसपास असतो. यात पोषक तत्वेही कमी असतात आणि कार्बोहायड्रेट्स जादा असतात. त्यामुळे पांढरा तांदुळ खाल्ल्याने वजन खुप वाढते. लठ्ठपणा वाढल्याने डायबिटीजचा धोका वाढतो. जे आधीपासून डायबेटीक आहेत त्यांनी तर पांढरा तांदुळ खाऊच नये असा दिला जातो. कारण त्याने शुगर वाढते.आपल्या देशात अनेक प्रकारचे तांदुळ पिकतात. आपण 5 अशा प्रकारचे तांदुळ पाहणार आहोत ज्यात पोषक तत्व पुरेपुर आहेत.

भात खाणे सर्वांना आवडते. उत्तर पासून दक्षिणेपर्यंत भाताला सर्वांची पसंती आहे.भात पचायला चांगला असतो आणि यात फायबर आणि काही पोषक तत्वं कमी असतात. तरीही भात ग्लुटेन मुक्त अन्न आहे. कार्बोहाटड्रेट्सचे प्रमाण जादा असल्याने हा पदार्थ एनर्जीपण देतो. परंतू यापासून नुकसान जास्त असल्याने पांढरे तांदूळ खाण्याचा सल्ला दिला जात नाही.(types)चला तर पांढऱ्या तांदुळाला कोणता पर्याय आपल्याकडे आहे. न्यट्रिएंट्स रिच तांदळाची व्हरायटी पाहूयात.
ब्लॅक राईस
भारताच्या पूर्वोत्तर राज्य मणिपूर आणि आसाममध्ये काळा तांदुळ उगवला जातो.ब्लॅक राईस अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो. त्यास येथे ‘चाक हाओ’ असे म्हणतात. तुम्ही या काळ्या तांदुळास डाएटचा भाग बनवू शकता. हे काळे तांदुळ डार्क वांगी कलरचे असतात. यातील काळा रंग एंथोसायनिन नावाच्या एंटीऑक्सीडेंटमुळे येतो. हा तांदूळ फ्रि रेडिकल्सपासून वाचवतो.
रेड राईस
भारताचे दक्षिणेकडील केरल वा तामिळनाडु या रेड राईस लाल तांदळाची शेती केली जाते. यास येथे “बाओ-धान” नावानेही ओळखले जाते. ही खूप लोकप्रिय तांदुळाची जात आहे आणि सहज मिळते. उत्तरकाशी आणि बागेश्वरमध्ये या लाल तांदळाची शेती केली जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी लाल तांदुळ फायद्याचा आहे.

नवारा राईस
भारतात आढळणाऱ्या विविध जातीच्या तांदळात नवारा तांदुळ देखील एक प्रकारचा औषधी गुणांना परिपुर्ण असा तांदूळ आहे. या तांदुळात एंटीऑक्सीडेंट्स आणि अनेक विटामिन्स-मिनरल्स असतात.या तांदुळाचा शिशुपासून ते वयस्क लोकांसाठी फायदेशीर आहे.या तांदुळास नजावारा वा शास्तिका शाली असे देखील म्हटले जाते.
काळे जीरा राईस
तांदुळाचा विविध जाती भारतात आहेत. (types)काळा जीरा राईस देखील एक पोषक तत्वांनी भरपूर अशी जात आहे. या तांदुळास कोरापुट काला जीरा चावल देखील म्हटले जाते. या तांदुळाचा सुगंध आणि कमालीची चव लोकांना आवडते. हा तांदळाचे दाणे काळे आणि छोटे असल्याने ते जिऱ्यासारखे असते. हा तांदुळ ओडिशाच्या कोरापुटमध्ये जास्त उगवले जातात.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय