लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी! ‘या’ तारखेला मिळणार हप्ता

राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘मुख्यमंत्री (available)माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे लाभार्थ्यांचे 3000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. 8 मार्च 2025 पर्यंत हा निधी पात्र लाभार्थींना मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे.‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळतो? :
या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना मिळत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार

– 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत.
– 11.8% अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत.
– 4.7% विधवा महिला आहेत.
घ- टस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचा वाटा 1% पेक्षा कमी आहे.

Ladki Bahin Yojana l वयोगटानुसार लाभार्थ्यांची संख्या(available) अशी आहे :
– 30 ते 39 वयोगटातील 29% महिलांना लाभ मिळत आहे.
– 21 ते 29 वयोगटातील 25.5% महिला लाभार्थी आहेत.
– 40 ते 49 वयोगटातील 23.6% महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
– 60 ते 65 वयोगटातील महिलांचा वाटा जवळपास 5% आहे.

महिला दिनानिमित्त विशेष हफ्ता :
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना आर्थिक मदत मिळावी(available) म्हणून 8 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता मिळणार आहे. त्यानंतर मार्च महिन्याचा हफ्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी मिळणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.
तसेच या योजनेबद्दल विरोधक सातत्याने टीका करत असले तरी, “महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विरोधकांना सुरुवातीपासूनच ही योजना खुपते, त्यामुळे त्यांना नैराश्य आले आहे,” असे आदिती तटकरे यांनी म्हटले.

हेही वाचा :

पाचव्यांदा आई होणार सीमा हैदर; बेबी शॉवरचा व्हिडिओ तुफान व्हायरल

घरात मांजर पाळताय, सावधान! बर्ड फ्लूने घेतला 18 मांजरींचा बळी

इचलकरंजीत हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी जल फवारणी यंत्रणेची मागणी

चांदीचा ग्राहकांना चकमा, सोन्यासह घेतली भरारी, काय आहेत किंमती?

आणखी एक धक्कादायक घटना, चुलत भावासोबत असताना 19 वर्षीय तरुणीवर…

पहिला दिवस विरोधकांचा! विषय मंत्र्यांच्या राजीनाम्याचा