बदलापूर शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला(rain) जातोय. याविरोधात महाविकास आघाडी थेट रस्त्यावर उतरली आहे. आज 24 ऑगस्टरोजी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात मविआकडून ‘निषेध आंदोलन’ करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी महायुती सरकारवर(rain) जोरदार हल्लाबोल करत थेट इशारा दिला. घटना घडली तेव्हा पोलिसांनी त्याची नोंद केली नाही. यामुळे ही कृती वारंवार घडत राहिली. यामुळे पोलिसांची भीती राहिली नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आंदोलन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत संवेदनशील आहे, ही फक्त त्यांची लेक नाही, ही आपली देखील लेक आहे. सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकींची जबाबदारी आपण सगळे घेऊयात. यानंतर अशी वेळ कोणत्या लेकीवर येऊ नये, यासाठी प्रयत्न करुत.”, असं सुळे म्हणाल्या.
“बदलापूर प्रकरणात आरोपीला फाशी होणार नाही, तोपर्यंत मविआचा कोणताही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. आपण सगळं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागू.”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टार्गेट केलं.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात सांगितलं होतं की, पुण्यात बलात्कार झालेल्या प्रकरणात दोन महिन्यांत आपण त्या नराधमाला फाशी दिली. असं झालं असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ. प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, “पुण्यातच कित्येक घटना घडल्या आहेत. इथे रक्त बदलण्यात आलं, ड्रग्ज प्रकरणे वारंवार समोर येतात, कोयता गँग अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे, बदलापूरातील आंदोलनानंतर सरकारमधील नेत्यांनी आंदोलन करणारे बाहेरचे होते, असं ,म्हटलं. पण ते कोणत्या का ठिकाणावरून येवो, ते भारतीय होते आणि ते भारतीय लेकीसाठी तिथे लढत होते. याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे.”, असा संताप सुळे यांनी व्यक्त केला..
हेही वाचा:
काका पुतण्याच्या राजकारणात नवा डाव?
भारताचं पहिलं पुन्हा वापरता येणारं हायब्रीड रॉकेट लाँच; अंतराळात मोठं यश
गूड न्यूज! जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन