आणखी दोन देश आमने सामने भारताची चिंता वाढली

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : दुसरे महायुद्ध तब्बल सहा वर्षे चालले. सहा कोटी लोकांचे जीव गेले. आणि भारतासह (India) 70 देश या महायुद्धात उतरले होते. आता 80 वर्षानंतर जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करते आहे की काय असा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती गंभीर वळणावर येऊन पोहोचली आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन देश युद्धाच्या सीमारेषेवर पोहोचले आहेत. दोन्ही देश कट्टरपंथीय इस्लामिक आहेत. तालिबानी दहशतवाद्यांकडून पाकिस्तानात अलीकडेच काही बॉम्ब स्फोट घडवून आणले गेले होते. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला होता. आता या दोन देशात केव्हाही युद्धाचा भडका उडू शकतो. या दोन्ही देशांच्या सीमा भारताला(India) लागून असल्यामुळे तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताची चिंता मात्र वाढली आहे.

हाक आणि अफगान हे दोन्हीही देश इस्लामिक असून सनातनवादी आहेत. विकासापेक्षा धर्म विकासाकडे अधिक लक्ष दिले गेल्याने हे दोन्ही देश आर्थिकदृष्ट्या कंगाल आहेत. खाली बांधण्यांनी यापूर्वी भारतासह अनेक देशात दहशतवादी कारवाया केल्या आहेत. पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ले अजूनही भारताच्या सीमावरती भागात केले जात आहेत. पाक आणि तालिबानी यांनी जे पेरले तेच आता त्यांच्या देशात उगवते आहे. दोन्ही देश दिवाळखोर आहेत.

येथील सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. स्वतःची आर्थिक स्थिती सुरळीत करण्याऐवजी कट्टरपंथीयांना बळ देण्यात दोन्ही देशातील शासक गुंग झाले आहेत. स्वतः बदलायला ते तयार नाहीत. जनतेला धर्माची अफूची गोळी देऊन गुंगीत ठेवण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले पण आता गुंगी उतरली आहे. लोकांनी रस्त्यावर येऊन जावं विचारू नये म्हणून मग युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे.

धर्माला केंद्रस्थानी ठेवून राज्यशकट चालवणाऱ्यांच्याकडून देश घडवता येत नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. पाक आणि आव्हान येथील आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना देश(India) घडवता आलेला नाही. अशीच स्थिती अनेक देशात आहे आणि म्हणूनच अनेक इस्लामिक देशात आजही अराजकसदृश्य वातावरण आहे. काही देशातही युद्ध ही सुरू आहे आणि ते थांबायला तयार नाही. संयुक्त राष्ट्र संघ ही या देशांसमोर हातबल ठरला आहे.

युद्धग्रस्त स्थितीला दहशतवादी संघटनांच कारणीभूत ठरल्या आहेत. इस्रायल ला हातात शस्त्र घेण्यासाठी हमास या दहशतवादी संघटनेनेच प्रवृत्त केले. सध्या गाझापट्टी पॅलेस्टाईन, इस्रायल, लेबनान, सिरीया, येमेन,इराण, तुर्कस्तान , सुदान, सोमालिया, तसेच रशिया, युक्रेन, हे देश युद्धग्रस्त आहेत. त्यापैकी बहुतांशी देश हे इस्लामिक आहेत. आता त्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची भर पडली आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बायोडेन यांनी अफगाणिस्तान मध्ये अमेरिकन सैन्य माघारी घेतल्यानंतर तेथे 2021 मध्ये तालिबानी सरकार स्थापन झाले. तेव्हा अफगाणिस्तानची सत्ता उलथून टाकणाऱ्या तालिबान्यांचे पाकिस्तानने प्रचंड स्वागत केले होते. त्यादिवशी पाकिस्तानमध्ये ईद सणासारखे वातावरण होते. आता हे दोन देश एकमेकांच्या विरुद्ध ठाकले आहेत. पंधरा हजार पेक्षाही अधिक तालीबांनी सैनिक हे पाकिस्तानच्या सीमेकडे निघाले आहेत. त्यामुळे नजीकच्या काही दिवसात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर्मन ने 30 सप्टेंबर 1939 मध्ये पोलंड वर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. जर्मनीच्या(India) बाजूने असलेल्या जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर दिनांक एक डिसेंबर 1941 मध्ये हवाई हल्ला केल्यानंतर या युद्धात अमेरिकेला उतरावे लागले आणि तेथूनच दुसऱ्या महायुद्धाची व्याप्ती जगभर वाढली. आताही हमास या दहशतवादी संघटनेने कोणत्याही कारण नसताना इस्रायलवर एकाच वेळी हजारो रॉकेट सोडली आणि अख्खातात युद्धाचा भडका उडाला. त्याची व्याप्ती ही वाढली होती.

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात शस्त्र संधी झाल्यामुळे युद्धाचे ढग पांगलेले दिसत असले तरी ती वरवरची शांतता असल्याचे बोलले जाते. एकूणच तिसऱ्या जागतिक युद्धाकडे जगाची वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने यामध्ये हस्तक्षेप केला तर वातावरण पालटू शकते.

सध्या पाकिस्तानात आर्थिक दिवाळखोरी आहे. शेजारच्या बांगलादेशात अस्वस्थ वातावरण आहे. श्रीलंकेतही फारसे चांगले वातावरण नाही. युद्धखोर आणि अस्वस्थ बनलेल्या शेजारच्या देशांमुळे भारताची चिंता वाढली आहे. सीमेलगतच्या देशामध्ये शांतता असेल तर भारतामध्ये त्याचे सकारात्मक परिणाम होतात.

हेही वाचा :

ट्रॅव्हिस हेडच्या सेलिब्रेशनवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले, म्हणाले- अशी शिक्षा एखाद्याला…

वर्षाच्या शेवटी सोन्याच्या दरात वाढ की घट? जाणून घ्या ताजे अपडेट

व्यक्तीगत फायनान्समध्ये 1 जानेवारीपासून मोठे बदल: LPG, PF, UPI आणि बँकिंग अपडेट्स