दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले

आज 1 ऑक्टोबररोजी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरचे(gas cylinder) दर वाढले आहेत. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडरचा दरातही बदल होतो. मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या महिन्यात देखील व्यावसायिक सिलिंडर महागले आहे.

ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये(gas cylinder) 94 रुपयांची वाढ झालेली आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1900 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 48 रुपयांची वाढ करण्यात आलीये.

चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1903 रुपये तर कोलकाता शहरात सिलिंडरची किंमत 1850.50 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईतही गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 48.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत गॅस सिलिंडर 1692.50 रुपयांवर पोहोचले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सतत वाढ दिसून आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सरासरी 94 रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच कोलकाता आणि मुंबईमध्ये 94.5 रुपयांची वाढ झाली आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मार्च महिन्यापासून कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा दर 802.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर 818.50 रुपयांवर गेला आहे.

मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. मार्चनंतर घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. तसेच पुढच्या महिन्यात दिवाळी हा मोठा सण आहे. त्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा:

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक ‘महाविक्रम’!

अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी

उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी निवडणूक लढवण्याचे आव्हान: एकनाथ बावनकुळे