भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी

मुंबई : यंदा भारतीय शेअर बाजारात(stock market) मोठ्या प्रमाणावर आयपीओ लिस्ट झाले. आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी, प्रमोटर्सनी आणि गंतवणूकदारांनी मोठी कमाई केली. आज भारतीय शेअर बाजारात बीएसईवर आणि एनएसईवर मिळून 6 आयपीओ लिस्ट झाले. यामध्ये ममता मशिनरी, ट्रान्सरेल लायटिंग, डीएएम कॅपिटल्स अॅडव्हायजर्स, कॉनकॉर्ड एनवायरो, सनातन टेक्स्टाईल या मेनबोर्ड आयपीओसह न्यूमलायम स्टील कंपनीचा एसएमई आयपीओ लाँच झाला.

ममता मशिनरी, ट्रान्सरेल लायटिंग, डीएएम कॅपिटल्स अॅडव्हायजर्स, कॉनकॉर्ड एनवायरो, सनातन टेक्स्टाईल, न्यूमलायम स्टील कंपनीचे आयपीओ 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुले होते. सर्व आयपीओंना गुंतवणूकदारांनी(stock market) तगडा प्रतिसाद दिला होता.

ममता मशिनरीचा आयपीओ 194.95 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं 179.39 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. या आयपीओचा किंमतपट्टा 230-243 रुपयांदरम्यान होता. या आयपीओचा जीएमपी 255 रुपयांवर पोहोचला होता.ममता मशिनरीचा आयपीओ 147 टक्के प्रीमियमसह 600 रुपयांवर लिस्ट झाला.

डीएएम कॅपिटल अॅडव्हाजर्स लिमिटेडच्या आयपीओला 81.88 पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. याचा किंमतपट्टा 269-283 रुपयांदरम्यान होता. सध्या जीएमपी 145 रुपयांवर पोहोचला होता. 840.25 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी IPO आणला गेला होता. हा आयपीओ 39 टक्के प्रीमियमसह 393 रुपये प्रतिशेअरनं लिस्ट झाला.

ट्रान्सरेल लायटिंगचा आयपीओ 838.91 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. हा आयपीओ 82 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओचा किंमतपट्टा 432 रुपये होता. आयपीओचा जीएमपी 167 रुपये रुपयांवर पोहोचला होता. हा आयपीओ 36.5 टक्के प्रीमियमसह 590 रुपयांवर लिस्ट झाला.

सनातन टेक्स्टाइल्स या कंपनीच्या आयपीओला 35.12 पट सबस्क्राइब करण्यात आलं होतं. या आयपीओचा किंमतपट्टा 305-321 रुपये होता. कंपनीनं हा आयपीओ 550 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला होता. आयपीओचा जीएमपी 87 रुपयांवर पोहोचला होता. सनातन टेक्सटाइल्स 31 टक्के प्रीमियमसह 422 रुपयांवर लिस्ट झाला.

कॉनकार्ड एनवायरो सिस्टीम्सचा आयपीओ 10.67 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं आयपीओ 500 कोटींच्या उभारणीसाठी आणला होता. या आयीपओचा जीएमपी 134 रुपयांवर पोहोचला होता. 665 ते 701 रुपयांदरम्यान किमतपट्टा होता. 17 टक्के प्रीमयमसह हा आयपीओ 826 रुपयांना लिस्ट झाला. प्रतिशेअर गुंतवणूकदारांना 125 रुपये फायदा मिळाला.

न्यूमलायम स्टील कंपनीचा एसएमई आयपीओ एनएसएईवर लिस्ट झाला. या आयपीओतून गुंतवणूकादारांना परतावा मिळाला नाही. कंपनीनं निश्चित केलेल्या किंमतपट्ट्यानुसार आयपीओ लिस्ट झाला.

हेही वाचा :

धनंजय मु्ंडेंच्या कार्यकर्त्याने खुलेआम केला हवेत गोळीबार

रोहित शर्मा जडेजावर भडकला! म्हणाला – त्याला आऊट कोण करणार मग? व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान