अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान(sparks) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आर्यन खानचं नाव अनन्या पांडे, शनाया कपूर यांच्यासोबत अनेकदा जोडलं जातं पण आता आर्यन हा ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीला डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
सोशल मीडियावर आर्यन आणि लॅरिसा यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल(sparks) झाले. आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये देखील लॅरिसा दिसली. जाहिरातीमध्येआर्यन आणि लॅरिसा हे एकमेकांच्या जवळ उभा राहिलेले दिसली. त्यानंतर आर्यन आणि लॅरिसा यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली.
आर्यन खान हा इंस्टाग्रामवर लॅरिसाला फॉलो करतो. वाढदिवशी लॅरिसाच्या आईला आर्यनने खास भेटवस्तू दिली होती, असंही म्हटलं जात आहे. प्रसिद्ध गायक गुरू रंधवाच्या ‘सूरमा सुरमा’ या म्युझिक व्हिडीओमध्ये लॅरिसानं काम केलं आहे. तिने स्टेबिन बेन आणि विशाल मिश्राच्या संगीत व्हिडीओमध्ये देखील काम केलं आहे. तिने काही साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘थिक्का’ या तेलुगू कॉमेडी चित्रपटामध्ये लॅरिसानं काम केलं आहे. लॅरिसाने मौनी रॉयसोबत ‘पेंट हाउस’ या चित्रपटात काम केले आहे. लॅरिसाचं नाव याआधी सूरज पांचोलीसोबत जोडलं जात होतं. पण आता तिच्या आणि आर्यनच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
लॅरिसा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. लॅरिसा ही तिच्या विविध लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 563k फॉलोवर्स आहेत.
हेही वाचा :
भयंकर उकडतंय… म्हणत उर्फीचा नको ‘तो’ प्रकार; ट्रोलर्स म्हणाले, आता एवढंच बाकी होतं..
काँग्रेसद्वयींच्या भांडणात भाजपचा लाभ! 42 वर्षांनी विजयी एन्ट्री
मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; गजानन राणेंसह इतर २० साथीदारांवर गुन्हा