Whatsapp ला टक्कर देणार Jack Dorsey चं Bitchat! इंटरनेटशिवाय करणार कामं

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे.(platform) व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात करोडो युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असते. हे फीचर्स युजर्ससाठी अत्यंत खास असतात. या फीचर्समुळे युजर्सचा अ‍ॅप वापरण्याचा अनुभव बदलतो. आता याच लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी एक नवीन अ‍ॅप लाँच करण्यात आलं आहे. ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक नवीन मेसेजिंग अ‍ॅप ‘Bitchat’ लाँच केले आहे. हे अ‍ॅप खास आहे कारण हे अ‍ॅप इंटरनेटशिवाय चालणार आहे. हे अ‍ॅप अशाप्रकारे डिझाईन करण्यात आलं आहे की, त्याचा वापर करण्यासाठी युजर्सना इंटरनेटची गरज भासणार नाही.

नवं मेसेजिंग अ‍ॅप Bitchat इंटरनेटशिवाय काम करण्यासाठी खास प्रकारे डिझाईन करण्यात आले आहेत. डोर्सीने हे नवीन अ‍ॅप “वीकेंड प्रोजेक्ट” म्हणून लाँच केले आहे. या अ‍ॅपमागील तंत्रज्ञान आणि कल्पना पूर्णपणे अनोखी आहे. Bitchat ची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे यामध्ये युजर्सना कोणत्याही वैयक्तिक माहितीची आवश्यकता नाही. म्हणजेच युजर्सचा मोबाईल नंबर, ईमेल आईडी शेअर करण्याची आवश्यकता नाही. हे अ‍ॅप अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहेत, ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन कमजोर आहे किंवा अजिबात उपलब्ध नाही. (platform) या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स ऑफलाईन आणि केवळ ब्लूटूथच्या मदतीने त्यांच्या जवळील लोकांना मेसेज पाठवू शकणार आहेत आणि मेसेज प्राप्त देखील करू शकणार आहेत

Bitchat, पीयर-टू-पीयर मेसेजिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना इंटरनेट, वाय-फाय किंवा मोबाइल डेटाची आवश्यकता नाही. अ‍ॅप ब्लूटूथद्वारे त्यांच्या जवळील डिव्हाईस कनेक्ट करते आणि एक नेटवर्क तयार करते. जर मेसेज पाठवणारा आणि तो प्राप्त करणारा यूजर एकमेकांपासून दूर असेल,(platform) तर मेसेज जवळच्या डिव्हाईसद्वारे एकमेकांकडे “हॉप करतो” आणि त्याच्या वास्तविक रिसीवरपर्यंत पोहोचतो. याला मेश नेटवर्किंग म्हणतात. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही मध्यवर्ती सर्व्हर किंवा कोणत्याही प्रकारचा यूजर आयडी नसतो.

आता असा प्रश्न उद्भवतो की या अ‍ॅपमुळे युजर्सच्या प्रायव्हसीवर परिणाम होणार का? तर नाही. अ‍ॅपमध्ये end-to-end encryption चा वापर केला जातो. ज्यामुळे मेसेज पाठवणारा आणि रिसिव्ह करणाराच तोच वाचू शकणार आहे. या संपूर्ण प्रोसेस दरम्यान कोणताही तिसरा व्यक्ती, अगदी अ‍ॅप स्वतः देखील, हे संदेश अ‍ॅक्सेस करू शकत नाही. याशिवाय, काही काळानंतर संदेश आपोआप हटवले जातात, ज्यामुळे गोपनीयता आणखी मजबूत होते.

Bitchat चे खास फीचर्
इंटरनेट फ्री मेसेजिंग: हे अ‍ॅप वाय-फाय, मोबाइल डेटाशिवाय काम करते, या अ‍ॅपसाठी केवळ ब्लूटूथची आवश्यकता आहे.ब्लूटूथ मेश नेटवर्किंग: डिव्हाईस सुमारे 30 मीटर अंतरापर्यंत एकमेकांशी जोडले जाऊ शकतात.अनामिक चॅटिंग: अकाउंट तयार करण्याची गरज नाही, याशिवाय अ‍ॅपमध्ये कोणताही फोन नंबर किंवा ई

हेही वाचा :

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर

महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर