माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी(lovers website) सुरू केलेल्या आंदोलनाला 14 जुलैला हिंसक स्वरुप प्राप्त झालं होतं. हिंदू संघटनांनी दगडफेक, जाळपोळ करून घरांचे आणि वाहनांचे नुकसान केले. दरम्यान, या हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप होते आहेत. अशातच आता जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशाळगडावरील दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना असा महाराष्ट्र अपेक्षित नव्हता, असं पाटील म्हणाले.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/07/image-8-1024x819.png)
जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी सोलापूर येथे माध्यमांशी संवाद(lovers website) साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, विशाळगडाच्या पायथ्याशी जे लोक अतिक्रमण हटवण्यासाठी आले होते, त्यांनी तिथल्या जवळच्या गावात जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला केला. घरांची नासधुस करणे, तिजोऱ्या फोडणे व मालमत्ता लुटणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हते. शिवप्रेमी हे काम करू शकत नाहीत, त्यामुळे या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असं पाटील म्हणाले.
पुढं बोलतांना ते म्हणाले की, या सर्व घटना घडत असतांना पोलीस जनतेला संरक्षण देण्याच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. तिथं हिंदू व मुस्लीम दोन्ही समाजांचे लोक आहेत. दोन्ही धर्माच्या लोकांनी गडावर अतिक्रमण केलं आहे, असं पाटील म्हणाले.
विशाळगडावरील हिंसाचारानंतर काल उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडावर जाऊन हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली. ते म्हणाले, विशाळगडावरील ज्या व्यवसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झाल आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही, अशी ग्वाही अजित पवारांनी पीडितांना दिली.
पुढं बोलतांना ते म्हणाले, विशाळगडावर उसळलेल्या दंगलीप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही कायदा आणि नियम हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, असं अजित पवार म्हणाले. निष्पाप लोकांच्या घरांचे नुकसान झालं आहे. येथे राहणाऱ्या लोकांचा अतिक्रमणाशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने नुकसानग्रस्तांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिलेली आहे, असंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :
मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना दिलासा
संकटात खाकी वर्दीतील ‘देव’ मदतीला धावला; धावत्या ट्रेन मध्ये चढताना पाय निसटला अन्… Video
“किती प्रॉपर्टी घेऊन चाललीस?”; हार्दिकपासून विभक्त होताच नताशा नेटकऱ्यांकडून ट्रोल
आधी सोबत दारू प्यायली, नंतर मित्रानेच मित्रावर चाकूने भोसकले अन्…