5 सप्टेंबर 2016 मध्ये जियो(jio) भारताच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रवेश केला आणि भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठी क्रांती झाली. सामान्य माणसापर्यंत 4 G नेटवर्क पोहचले. या कंपनीची तब्बल 49 कोटी वापरकर्ते आहेत. जगातील सर्वात जास्त मोबाईल नेटवर्क वापरकर्ते असणाऱ्या कंपनीपैकी एक आहे.
स्पर्धक कंपन्यांनाही जिओच्या(jio) पदार्पणामुळे दर कमी करावे लागले होते. जिओ कंपनीची सुरवात होऊन आज आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. ही ऑफर 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान असणार आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना खास फायदे मिळणार आहेत. जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल
या खास ऑफरच्या अंतर्गत, 899 आणि 999 रुपयाच्या त्रैमासिक आणि 3599 रुपयाच्या वार्षिक प्लॅन दिले गेले आहेत. 899 प्लॅनची वैधता 90 दिवस असून 999 च्या प्लॅनची वैधता 98 दिवसांची आहे, ज्यामध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. त्याच वेळी, ₹ 3599 च्या वार्षिक प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 2.5GB डेटाचा लाभ मिळतो, ज्याची वैधता 365 दिवसांसाठी आहे.
तर या प्लॅन्समध्ये जिओने विशेष ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना तीन विशेष फायदे मिळतील, ज्यामध्ये 10 OTT सबस्क्रिप्शन आणि 10GB डेटा पॅक, Zomato गोल्ड मेंबरशिप आणि AJIO व्हाउचर यांचा समावेश असेल. 10 OTT सबस्क्रिप्शन आणि 10GB डेटा पॅकची वैधता 28 दिवस असेल. तर झोमॅटोच्या गोल्ड मेंबरशिपची ही तीन महिन्यांसाठी मोफत मिळणार आहे. AJIO कडून २९९९ रुपयांवरील खरेदीवर तुम्हाला ५०० रुपयांचे व्हाउचर मिळेल.
जिओची सुरुवात 8 वर्षांपूर्वी झाली ज्यावेळी कंपनीने भारताला डिजिटली सक्षम करण्याचे स्वप्न पाहिले होते. तेव्हापासून, जिओने ग्राहकांसाठी केवळ उच्च गतीचा डेटा स्वस्त आणि सुलभच बनवला नाही, तर देशाच्या डिजिटल विकासातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. जिओने बाजारात आणलेला स्वस्त 4G मोबाईल फोनचाही ग्राहकांना लाभ झाला होता.
कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी माहिती दिली होती की, जगात जिओ कंपनी 8 टक्के डेटा पुरविते. मोबाईल नेटवर्कबरोबर जिओ फायबरमुळे ही जिओच्या नेटवर्कमध्ये वाढ झाली आहे. जिओ वापर्कर्त्यांची संख्याही 8 वर्षात 49 कोटी पोहचली असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे.
सणासुदीच्या काळात जिओकडून आलेल्या या ऑफरमुळे ग्राहकांना डेटा पासून ते गोल्ड मेंबरशिपपर्यंत फायदे होणार आहे. 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत हे ऑफर्स उपलब्ध असल्याने पुढील 5 दिवसात ग्राहक या विशेष ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा:
राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; ठाकरे गटाला दिला मोठा धक्का
गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का?
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 10 निर्णय, शेतकऱ्यांसाठी ‘हे’ ठरेल महत्त्वाचे