रिलायन्स जिओला ग्राहकांनी जोरदार धक्का दिला आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या Q2 च्या आकडेवारीनुसार ग्राहकसंख्येत प्रचंड घट झाली आहे. तब्बल 1.09 कोटी ग्राहकांनी जिओची सदस्यता सोडली आहे त्यामुळे कंपनीला ग्राहकसंख्येत जबरदस्त नुकसान झाले आहे. या ग्राहकसंख्येमध्ये घट झाल्याचे कारण हे नुकत्याच झालेल्या रिचार्ज(recharge) प्लॅनच्या किमतीत वाढ हे आहे.
मात्र एकूण सदस्यांचे नुकसान झाले असूनही, कंपनीने प्रति वापरकर्ता सरासरी महसूल रु. 181.7 वरून 195.1 रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच कंपनीच्या 5G ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली आहे, 5 जी वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ही 130 दशलक्ष वरून 147 दशलक्षवर पोहोचली आहे. ARPU आणि वाढत्या 5G वापरकर्त्यांसह, Jio रिचार्ज (recharge)चा निव्वळ नफा 6,536 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मीडिया रिपोर्ट्नुसार , Jio सध्या टेलिकॉम बाजारामध्ये नेटवर्क स्पीड, कव्हरेज आणि सातत्य या तीन प्रमुख घटकांमध्ये वर्चस्व गाजवत आहे. Jio च्या डाउनलोड स्पीड हा 89.5 Mbps आहे त्यामुळे कंपनीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे, दरम्यान, इतर दूरसंचार कंपन्या जसे की Airtel 44.2 Mbps आणि vi कंपनी 16.9 Mbps स्पीड प्रदान करते. जलद डाउनलोड गतीसह, स्ट्रीमिंग, गेमिंग आणि इतर यासारख्या जलद मोबाइल इंटरनेट यामुळे जिओ कंपनी अजूनही ग्राहकांसाठी ही पहिली पसंती बनली आहे.
शिवाय, कंपनी संपूर्ण भारतभर सर्वात विस्तृत नेटवर्क कव्हरेज देखील देते, कंपनीचे नेटवर्क देशातील अगदी दुर्गम प्रदेशांपर्यंत पोहोचते. जिओ ग्रामीण भागात दूरसंचार सेवा सिद्ध करण्यातही सक्षम आहे, जिथे विश्वसनीय मोबाइल सेवांचा प्रवेश अनेकदा मर्यादित असतो. त्यामुळे याबाबतीतही जिओ वरचढ आहे. Income Tax भरण्यात 39 टक्के योगदानासह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर! इतर राज्यांची नेमकी स्थिती काय?
नेटवर्क सुसंगततेच्या बाबतीत, जिओने 66.5 टक्क्यांसह आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले, डेटा सेवा आणि व्हॉईस कॉल या दोन्हींसाठी स्थिर आणि अखंड अनुभव प्रदान केला. ही विश्वासार्हता उच्च-गुणवत्तेचा वापरकर्ता अनुभव राखण्यासाठी आवश्यक आहे. मग ते कामाच्या मीटिंगसाठी किंवा जाता-जाता व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी असो.
ग्राहकांना रिचार्जचमध्ये करण्यात आलेली दरवाढ हा सदस्यता सोडण्यासाठी कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे जिओला या तिमाहीमध्ये फटका बसला आहे. मात्र कंपनीकडून देण्यात येणाऱ्या इतर सुविधेमुळे इतर ग्राहक जिओसोबत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:
सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार का?
‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!
सोन्याला पुन्हा झळाळी! दिवाळीपूर्वी थेट…जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर