पहिल्या दोन सामन्यांमध्ये फेल झालेला बेन स्टोक्स हा शतक(teams) झळकावण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या.

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या लॉर्ड कसोटी सामन्याचा काल पहिला दिवस पार पडला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू (teams)असलेल्या सामन इंग्लंडच्या संघाने आणखी एकदा नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या सुरू असलेल्या सामन्यात इंग्लिश संघाचे चार फलंदाज हे बाद झाले आहेत सध्या जोरूट आणि बेन स्टोक हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करत आहेत.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये फेल झालेला बेन स्टोक्स हा शतक झळकावण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या. (teams)भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर नितेश कुमार रेड्डी यांनी दोन विकेट्स नावावर केले तर एक विकेट जसप्रीत बुमराच्या हाती लागला आणि रवींद्र जडेजा यांनी एक विकेट संघाला मिळवून दिली.
भारताच्या संघाने पहिल्या दोन सेशनमध्येच विकेट घेतले शेवटचा सेशनमध्ये भारताच्या हाती एकही विकेट लागली नाही. जो रूट हा सध्या 99 धावांवर खेळत आहे. इंग्लिश फलंदाजांचा कामगिरीबद्दल सांगायचं झाले तर बेन डकेट याने 23 धावांची खेळी खेळली तर जॅक क्रॉली याने संघासाठी 18 धावा केल्या. ओली पॉप त्याने संघासाठी महत्त्वाचे 44 धावा केल्या. दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा हॅरी ब्रूक या सामना स्वस्तात बाद झाला.
इंग्लंडच्या संघासाठी सध्या जो रूट आणि बेन स्टोक्स हे दोघे फलंदाजी करत आहेत. जो रूट याने आतापर्यंत पहिल्या दिनाच्या समाप्तीपर्यंत 99 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने नऊ चौकार मारले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स याने पहिल्या दिनाच्या समाप्तीपर्यंत 39 धावा केल्या आहेत. मागील दोनही सामन्यांमध्ये बेन स्टोक फेल ठरला.
पहिल्या दिवशी इंग्लंडने फलंदाजी करताना 4 विकेट गमावल्यानंतर 251 धावा केल्या. जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप आणि हॅरी ब्रूकच्या रूपात इंग्लंडला पहिल्या दिवशी 4 मोठे धक्के सहन करावे लागले. सध्या जो रूट 99 धावांवर आणि बेन स्टोक्स 39 धावांवर फलंदाजी करत आहेत. दुसरीकडे, टीम इंडियासाठी पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना नितीश रेड्डीने सर्वाधिक 2 बळी घेतले.
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे