जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडा थांबा.(car) कारण पुढील काही महिन्यातच एकापेक्षा एक SUVs मार्केटमध्ये लाँच होणार आहेत.

भारतातील अनेक मोठ्या कंपन्या आता दिवाळी 2025 पूर्वी अनेक नवीन(car) एसयूव्ही मॉडेल्स लाँच करण्याची तयारीत आहे. जर तुम्ही या दिवाळीत एक नवीन आणि स्टायलिश एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खालील 5 बहुप्रतिक्षित एसयूव्हींबद्दल नक्की विचार करा.
महिंद्रा बोलेरो निओ फेसलिफ्ट
महिंद्रा कंपनीची प्रसिद्ध कॉम्पॅक्ट एसयूव्ही बोलेरो निओ आता नवीन रूपात परतणार आहे. याचे फेसलिफ्ट व्हर्जन 15 ऑगस्ट 2025 रोजी लाँच केले जाईल. ही एसयूव्ही महिंद्राच्या नवीन फ्रीडम एनयू प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल, जे या कारला ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव देखील देईल.
मारुति एस्कुडो
या दिवाळीत मारुती सुझुकी त्यांची नवीन मध्यम आकाराची एसयूव्ही (car) एस्कुडो लाँच करणार आहे. ही एसयूव्ही ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल, परंतु आकाराने थोडी मोठी आणि किमतीत थोडी अधिक किफायतशीर असेल.
एरिना डीलरशिपद्वारे विकली जाणारी ही एसयूव्ही विशेषतः अशा ग्राहकांना लक्ष्य करेल, ज्यांना अधिक फीचर्ससह आणि चांगल्या किमतीत विश्वासार्ह एसयूव्ही हवी आहे. ही एसयूव्ही पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रिड इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे. जर तुम्हाला एक पॉवरफुल आणि बजेट-फ्रेंडली मिड साइझ एसयूव्ही हवी असेल, तर एस्कुडो तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट
Hyundai Venue चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन देखील दिवाळीपूर्वी बाजारात येणार आहे. ही SUV भारतात आधीच खूप लोकप्रिय आहे आणि आता त्याचे अपडेटेड व्हर्जन याला अधिक आकर्षक बनवेल. नवीन Venue मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ADAS सारखे सेफ्टी फीचर्स असण्याची शक्यता आहे.
टाटा पंच फेसलिफ्ट
टाटा मोटर्स त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मायक्रो एसयूव्ही पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन आणि त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जन, पंच ईव्ही येत्या ऑक्टोबर 2025 मध्ये लाँच करू शकते. आयसीई व्हर्जनमध्ये पंच ईव्हीपासून प्रेरित डिझाइन घटकांचा समावेश असेल, ज्यामुळे ते अधिक फ्यूचरिस्टिक दिसेल.
हेही वाचा :
मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर नाराज, अनेकांना डच्चू मिळणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
बचतीसोबत मिळवा संरक्षण, LIC च्या ‘या’ विमा पॉलिसी जाणून घ्या