सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

आता आपल्या सगळ्यांना सतर्क करणारी बातमी आहे. ही बातमी आहे, पाळीव प्राण्यासंदर्भात. आपल्यापैकी अनेकांच्या घरात मांजर (cat)असेलच. मात्र, याच मांजरांबाबत एक धक्कादायक, आश्चर्यकारक संशोधन समोर आलं आहे. मांजर पाळल्यामुळे कोणता तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. पाहूयात सविस्तर रिपोर्ट

घरात कुत्रा किंवा मांजर(cat) पाळणं, अनेकांना आवडतं. या पाळीव प्राण्यांचा घरच्यांना चांगलाच लळा लागतो. अगदी त्यांना घरातील व्यक्तीसारखीच वागणूक दिली जाते. त्यांचं खाणं, फिरणं यांच्याकडे कटाक्षाने पाहिलं जातं. त्यात मांजर अनेकांच्या घरात पाळली जाते.

पाळीव प्राण्यांमुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवतं, तुम्हाला आनंदी ठेवतं. पण आता मात्र कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाचा, मांजरांबाबतचं(cat) एक संशोधन समोर आलं आहे. या संशोधनानुसार पाळीव प्राण्यांमुळे काही आजार होतात, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला भयंकर धोका उद्भवू शकतो.

मांजरामुळे मेंदूचा गंभीर आजार होऊ शकतो

  • अमेरिकेत 10 ते 30 टक्के लोक एका स्किझोफ्रेनिया आजाराने संक्रमित आहेत
  • स्किझोफ्रेनिया व्यक्तीच्या मेंदूत राहतो आणि हळूहळू मेंदूवर परिणाम करतो.
  • कमी शिजवलेले मांस खाल्ल्याने किंवा मांजरीच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानं स्किझोफ्रेनिया होतो
  • स्किझोफ्रेनिया मेंदूवर गंभीर परिणाम होतो, त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा विस्मरणासासारखा आजार होऊ शकतो

स्किझोफ्रेनिया मांजरींमधून कसा पसरतो?

  • संशोधकांच्या मते, टॉक्सोप्लाझ्मा गोंडी हा परजीवी मांजरींपासून मानवापर्यंत पोहोचू शकतो.
  • यामुळे, मानवांमध्ये स्किझोफ्रेनिया विकसित होऊ शकतो.
  • संशोधकांच्या मते, टॉक्सोप्लाइमा गोंडी थेट मेंदूच्या न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम करू शकतात आणि सूक्ष्म अल्सर तयार करू शकतात.
  • यासाठी संशोधकांच्या पथकाने 17 अभ्यासांचा आढावा घेतला. त्यानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • गेल्या 44 वर्षांत अमेरिका आणि ब्रिटनसह 11 देशांमधील विद्यमान संशोधनातील डेटाचे विश्लेषण केलं आहे.
  • त्यांना असं आढळले की 25 वर्षापूर्वी मांजरींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट असते.

गर्भवती महिलांना या आजारामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्या देशात अनेक घरांमध्ये आपण मांजरी पाळत असतो त्यामुळे मांजरीपासून होणा-या या विशेष आजारापासून दूर राहायचं असेल तर मांजरीच्या स्वच्छतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

हेही वाचा :

वीज दर कमी नव्हे तर आणखी वाढणार

धावत्या बाईकवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स; VIDEO viral

येथे तीन दिवसांचा विक ऑफ, केवल चार दिवसच काम करा, कुठे लागू झाला हा नियम पाहा