पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुका होण्याआधीच पुन्हा पंतप्रधान झाल्याची स्वप्ने(dreams) पडू लागली आहेत.
आता शंभर दिवस मी जरा व्यग्र आहे, पण आमचे सरकार आल्यावर दुसऱयाच दिवशीपासून झपाटून काम करू. आताच त्यावर विचार करा, असे आज त्यांनी येथे रिझर्व्ह बँकेच्या 90 व्या वर्धापन दिन(dreams)सोहळ्यात सांगूनही टाकले.
मोदींच्या काळात रुपया जागतिक पातळीवर कधी नव्हता इतका नीचांकी घसरला आहे. तरीही जगभर रुपया अधिक स्वीकारार्ह आणि सर्वमान्य बनवण्यासाठी हिंदुस्थानला पुढील 10 वर्षांत आर्थिक स्वावलंबन वाढवण्याची गरज आहे, अशा वल्गना त्यांनी येथे केल्या, पण नेमके काय करायचे हे मात्र त्यांनी सांगितले नाही. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड आणि पंकज चौधरी उपस्थित होते.
हेही वाचा :
राज्यात उन्हाचा चटका कायम; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
तुम्ही वीज वापरतायं ना? आता जितका रिचार्ज, तेवढीच मिळेल वीज!
विजय देवरकोंडानं 25 लाखांसाठी विकला पहिला फिल्मफेयर पुरस्कार?