कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : जमिनींना सोन्याचा भाव आल्यानंतर शेतकऱ्यांनी(farmer) आपल्या जमिनी विकल्या. हातात आलेल्या बक्कळ पैशाने शेतकरी भांबावून गेला. आलेला पैसा कुठे गेला हे त्याचे त्यालाच कळले नाही. बऱ्याच जमिनी दहशत घालून विकत घेतल्या आणि नंतर त्या पुणे, मुंबईच्या धनदांडग्यांना विकल्या. मूळ शेतकरी देशोधडीला लागला.
याचे अतिशय सुंदर आणि भेदक चित्रण असलेला प्रवीण तरडे निर्मित, दिग्दर्शित, अभिनेता “मुळशी पॅटर्न”हा मराठी चित्रपट पाच-सहा वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालून गेला. हा चित्रपट वास्तवदर्शी होता. हेच वास्तव पुन्हा एकदा अतिशय ठळकपणे पुढे आले आहे. मनोरमा खेडकर यांनी “रिटर्न, मुळशी पॅटर्न” चे प्रत्यक्ष दर्शन घडवले असून पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय. ए.एस. अधिकारी पूजा खेडकर यांच्या मनोरमा खेडकर या मातोश्री आहेत. मनोरमा यांचे पती दिलीप खेडकर हे सुद्धा वादग्रस्त अधिकारी होते. सराईत लाचखोर म्हणून त्यांच्या विरुद्ध एकापेक्षा अधिक वेळा कायदेशीर कारवाई झालेली आहे. मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबाने जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यातील काही व्यवहार वादग्रस्त आहेत. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांशी त्यांचा वास झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर मनोरमा यांनी आपल्या पर्स मधील पिस्तूल बाहेर काढून ते शेतकऱ्यांना दाखवून दहशत निर्माण केली होती. पूजा खेडकर प्रकरण गाजू लागल्यानंतर मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दहशत घालण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि आता पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतल्यानंतर मुळशी पॅटर्न महाराष्ट्राच्या समोर नव्या स्वरूपात आला आहे.
गेल्या वर्षी हा प्रकार घडल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी(farmer) पोलीस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्यासह काहीजणांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती तथापि पौड पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. कदाचित खेडकर कुटुंबाच्या प्रभावाखाली आल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसावा. आता पूजा खेडकर प्रकरण बाहेर आल्यानंतर, गेल्या वर्षीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता त्याची पौड पोलिसांना दखल घ्यावीच लागली.
मनोरमा खेडकर यांना अग्नि शस्त्र बाळगण्याचा परवाना कोणी दिला आणि तो कोणत्या कारणासाठी दिला? शेतकरी म्हणून हा परवाना दिलेला असेल तर तो जंगली जनावरांच्या पासून स्वतःचा संरक्षण करण्यासाठी असतो. सर्वसामान्य माणसाला हे अग्निशस्त्र दाखवून दहशत निर्माण करणे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजला जातो. एखाद्याने परवाना असलेले अग्निशस्त्र अर्थात पिस्तूल, रिवाल्वर, किंवा 12 बोअरची बंदूक दहशतीसाठी हातात धरून ती दाखवली तर संबंधितांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल केला जातो. मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर व अन्य काही जणांच्या विरुद्ध पौड पोलिसांनी कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्यांना दहशत घातल्या प्रकरणी आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक होऊ शकते हे समजून आल्यावर मनोरमा खेडकर या फरारी झाल्या. महाड म्युझिकच्या हिरकणवाडी येथील लॉजवर त्या लपल्या. लॉजवर रूम मिळवण्यासाठी त्यांनी खोटे नाव सांगितले, खोट्या नावाचे आधार कार्ड दाखवले. आता याबद्दलही त्यांच्याविरुद्ध आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल.
मुळात खेडकर कुटुंब हे शेतकरी(farmer) आहे का? त्यांची महाराष्ट्रात कुठे तरी स्वतःची शेत जमीन आहे काय? कारण शेतकरी असल्याशिवाय कुणालाही शेती विकत घेता येत नाही. मुळशी तालुक्यात शेतजमिनी विकत घेताना त्यांनी आम्ही शेतकरी आहोत असा दाखला दिला होता काय? आता हा दाखला त्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून मिळवला आहे काय? याचीही चौकशी पोलीस आणि तहसीलदादांना करावी लागेल.
मुळशी तालुक्यात शेतजमिनी विकत घेताना खेडकर कुटुंबाने, ठरलेला दर संबंधित शेतकऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळेच शेत जमीन खरेदी प्रकरण वादग्रस्त ठरलं. त्यातूनच मनोरमा खेडकर आणि संबंधित शेतकरी यांच्यात वाद झाला. त्यामुळेच शेतकऱ्यांना दहशत घालण्यासाठी मनोरमा खेडकर यांनी आपल्या पर्समधून बाहेर काढून ते शेतकऱ्यांना दाखवले. गेले वर्षभर पडद्याआड गेलेले हे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगाशी आलेले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना दिलासा
संकटात खाकी वर्दीतील ‘देव’ मदतीला धावला; धावत्या ट्रेन मध्ये चढताना पाय निसटला अन्… Video
“किती प्रॉपर्टी घेऊन चाललीस?”; हार्दिकपासून विभक्त होताच नताशा नेटकऱ्यांकडून ट्रोल