यश राज फिल्म्स कियारा अडवाणी आणि तिच्या चाहत्यांसाठी खास भेट घेऊन येत आहे. वॉर 2 (War 2) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’, जे एक रोमँटिक आणि ग्रूवी ट्रॅक आहे, कियाराच्या वाढदिवशी(birthday gift) म्हणजेच उद्या रिलीज होणार आहे. वॉर 2 चे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी काल त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली.

त्यांनी सांगितलं की पहिलं गाणं ‘आवन जावन’ हे असेल आणि या गाण्यात सुपरस्टार हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर झळकणार आहेत. अयानने हेही उघड केलं की ‘ब्रह्मास्त्र’ मधील सुपरहिट गाणं ‘केसरिया’ तयार करणारी टीम प्रीतम दादा, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित सिंग पुन्हा एकत्र आली आहे ‘आवन जावन’ साठी.
अयान ने लिहिलं:”प्रीतम दादा. अमिताभ. अरिजित. हृतिक आणि कियाराची(birthday gift) अफलातून केमिस्ट्री, जे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसतील. रोमँटिक आणि ग्रूवी ‘आवन जावन’ आमच्या इटली शूटचं थीम सॉंग होतं. हे गाणं तयार करताना आमच्या संपूर्ण टीमला प्रचंड आनंद आणि उत्साह मिळाला.
हे गाणं लोकांपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे!” वॉर 2 हा यश राज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा महत्त्वाचा भाग आहे आणि 14 ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
मोदींना भाजपची गरज नाही! खासदार निशिकांत दुबेंचं स्फोटक विधान
सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला* .