‘मला बेशुद्ध करुन…’, अभिनेत्रीच्या आयुष्याचं वाटोळं होण्यापासून वाचलं, कर्जाचा डोंगर झाल्याने रस्त्यावर काढली रात्र

ती प्रतिभावान टीव्ही अभिनेत्री(Actress)जिने फक्त एकाच शोमध्ये नकारात्मक भूमिका साकारून खळबळ उडवून दिली. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते.सिनेक्षेत्रात अभिनेत्रींनी ‘कास्टिंग काउच’चा सामना केल्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. टीव्हीवरील एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री देखील अशाच एका अनुभवातून गेली होती. केवळ 16 व्या वर्षी तिने हा त्रास सहन केला होता. एकेकाळी कोट्यवधींच्या कर्जात बुडालेली ही अभिनेत्री रस्त्यावर रात्र घालवण्यास भाग पडली होती.

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे रश्मी देसाई. रश्मी ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री(Actress)आहे. तिने भोजपुरी सिनेमातून आपल्या अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांमध्ये चांगलाच प्रभाव निर्माण केला होता. आपल्या करिअरमध्ये तिने विविध प्रकारची पात्रं साकारली आहेत. रश्मी तिच्या थेट आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. ती अनेकदा सोशल मीडियावरही प्रत्येक विषयावर बिनधास्तपणे मत व्यक्त करत असते. रश्मीने स्वतः खुलासा केला आहे की तिलाही कास्टिंग काउचचा अनुभव आला आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात अशा घटना वारंवार घडत असतात. अनेक अभिनेत्री (Actress)आपल्या अनुभवांबद्दल उघडपणे बोलतात. रश्मीने 2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी 16 वर्षांची होते, तेव्हा दुर्दैवाने माझ्याबरोबरही असं काही घडलं. मला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. मी तिथे गेले आणि तिथे मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. पण मी कशीतरी तिथून पळून बाहेर आले. दुसऱ्या दिवशी माझी आई माझ्यासोबत तिथे गेली आणि त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी त्याला कानाखाली मारली. पुढे मात्र मला खूप चांगल्या लोकांचा सहवास लाभला.”

एका दुसऱ्या मुलाखतीत रश्मी देसाईने आपल्या कठीण काळाबद्दल सांगितले होते. तिने सांगितले, “माझा शो बंद झाल्यानंतर खूप काही अनुभवायला मिळालं. त्यानंतर मला चार दिवस रस्त्यावर झोपावं लागलं होतं. त्या काळात माझ्याकडे एक ऑडी A6 गाडी होती, त्याच गाडीत मी झोपत असे. माझं सामान मी माझ्या मॅनेजरच्या घरी ठेवून दिलं होतं. एवढंच नाही, तर मला त्या काळात फक्त 20 रुपयांचं जेवण खावं लागलं, जे रिक्षा चालक खायचे. अशाही दिवसांतून मी गेले आहे. त्या चार दिवसांत मी आयुष्याचे खूप अवघड क्षण पाहिले आहेत. मी घटस्फोटाचं दु:ख देखील भोगलं आहे.”

रश्मी देसाई अखेरच्या वेळेस गुजराती चित्रपट ‘मोम तने नई समझे’ मध्ये झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता अमर उपाध्याय (मिहीर) होता. त्याशिवाय तिला सर्वाधिक ओळख टीव्हीवरील ‘उतरन’ या मालिकेमुळे मिळाली होती.

हेही वाचा :

पुण्यात खराखुरा सैराट! नवऱ्याला मारहाण करुन 28 वर्षीय तरुणीला बळजबरीनं…; घटना कॅमेरात कैद
आता राष्ट्रपतीच सोडवू शकतात “महादेवी’ चा घटनात्मक पेंच
महादेवी हत्तीणीच्या मुद्यावरून आंदोलक संतप्त, कोल्हापुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनजिल्हाधिकारी कार्यालयातून हाकललं