कोल्हापूर:गांजा तस्करीचे ‘मिरज’ जंक्शन; कर्नाटक सीमेवरून आयात, ओसाड माळावर लागवड

गंजी गल्लीत सापडलेल्या गांजाचे ‘मिरज’ कनेक्शन शोधून काढण्यात लक्ष्मीपुरी पोलिसांना यश आले.(found) तपासाच्या निमित्ताने पोलिसांनी घेतलेल्या माहितीत पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या तस्करीचे मुख्य केंद्र मिरजच असल्याचे आता उघड झाले आहे. शिरोळ तालुक्यात सापळा रचून मिरजेच्या मदिना शेख या पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महिलेला पकडण्यात आले. साथीदारासोबत पाच किलो गांजा घेऊन ती बिनधास्तपणे जिल्ह्यात आली होती. तिच्या चौकशीत मिरजेतील गांजा तस्करीचे नवनवे खुलासे होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गांजासह ड्रग्जची होणारी विक्री चिंतेचा विषय बनली आहे. एकेकाळी अगदी तुरळक प्रमाणात मिळणारा गांजा पोत्यातून सापडू लागल्याने या रॅकेटची व्याप्ती आणखीच वाढल्याचे स्पष्ट आहे. गांजासोबतच एम.डी. ड्रग्ज, चरस, कोकेन, अफू यांची तस्करी आता वाढू लागली आहे. सीमावर्ती भागातून याला अधिकच बळ मिळाल्याचे या कारवायांतून वारंवार समोर येत आहे.

गंजी गल्लीमध्ये सापडलेल्या इरफान मोदीकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. (found)त्याला गांजा पुरविणारे तिघेही स्थानिकच निघाले. त्यांच्याकडे फारसा गांजा मिळून न आल्याने पोलिस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी यातील नईम पठाणकडे अधिक विचारपूस केली. त्याच्या चौकशीत मिरजेतील काही नावे समोर आल्याने तपास ‘मिरज’ कनेक्शनच्या अनुषंगाने फिरविण्यात आला.

मिरजेतील गांजा विक्री करणाऱ्यांकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जाते. नव्याने आलेल्या गिऱ्हाईकाला येथे कसलाच प्रतिसाद मिळत नाही. जुन्या खेळाडूंना मात्र कोणताही फोन न करता गांजा उपलब्ध केला जातो. बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात अगदी पान टपरी, दुकानांमध्येही गांजा मिळत असल्याचे तपासात समोर येत आहे.लक्ष्मीपुरी पोलिसांनी मदिना शेख हिला गांजा घेऊन कोल्हापुरात बोलावले, पण तिनेही सावधपणे शिरोळपर्यंत येण्याचे मान्य केले. सीमावर्ती भागात गेल्या काही वर्षांत तस्करी फोफावली असून, याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येते. (found)मदिना हिनेही गांजा घेऊन शिरोळ गाठले. याच ठिकाणी सापळा रचून तिला पकडण्यात आले. जून महिन्यात कर्नाटकातून गांजा आणणाऱ्या बुचडे नावाच्या महिलेला पकडण्यात आले. तिनेही सीमाभागातून गांजा आणल्याची कबुली दिली होती.

हेही वाचा :

आज मंगळवारी ‘या’ 6 राशींवर प्रसन्न होणार गणराया! मनातल्या इच्छा होतील पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा

टीम इंडियावर नवे संकट, तोडावे लागेल इंग्लंडचे ‘चक्रव्यूह’; पिचचा भयानक चेहरा…

 गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सकारात्मक होणार आज शेअर बाजाराची सुरुवात