कोल्हापूरच्या उमेदवारांचा विषय हार्ड; शाहू महाराज छत्रपतींची संपत्ती २९७ कोटी, मंडलिकांची किती?

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात तोडीस तोड उमेदवार(presidential candidates) देण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात नेहमी चर्चेत असणारा जिल्हा म्हणजे कोल्हापूर… कोल्हापूरकरांचा विषय म्हणजे नेहमीच नादखुळा असतो. जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत देखील मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

सध्या या मतदारसंघात उमेदवारी(presidential candidates) अर्ज दाखल करण्याचे काम सुरु आहे. दोन्ही मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व उमेदवारांकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येकाला विवरणपत्र सादर करावे लागते. ज्यामध्ये त्यांची किती संपत्ती आहे या सर्व बाबी नमूद असतात. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती विरुद्ध मंडलिक अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर हातकणंगलेत राजू शेट्टी, धैर्यशील माने, सत्यजित पाटील या तिघांमध्ये रंगतदार सामना होणार आहे. या सर्वांनीच आपली संपत्ती किती आहे, याबाबत उमेदवारी अर्ज भरताना विवरणपत्रात माहिती दिली आहे. यामध्ये सर्वात जास्त संपत्ती आहे ती म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार ‘शाहू महाराज छत्रपती’ यांची.

शाहू महाराज यांच्याकडे तब्बल 297 कोटी 38 लाखांची संपत्ती असल्याची माहिती विवरणपत्रात नमूद केली आहे. त्यांच्यापाठोपाठ संजय मंडलिक यांची 14 कोटी 37 लाख 27 हजार इतकी संपत्ती आहे. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 4 कोटी 45 लाख 71 हजार 828 रुपये इतकी आहे आणि सत्यजित पाटील यांची संपत्ती 3 कोटी 57 लाख 83 हजार इतकी आहे त्यांच्या पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची 2 कोटी 81 लाख 34 हजार 866 रुपये मालमत्ता असल्याचे विवरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तब्बल 297 कोटी 38 लाख रुपये आहे. मात्र विशेष बाब म्हणजे शाहू महाराज यांच्या नावे कोणतेही कर्ज नाही. शाहू महाराजांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे शाहू महाराज यांची संपत्ती किती?

जंगम मालमत्ता – 147 कोटी 64 लाख 49 हजार
स्थावर मालमत्ता – 50 कोटी 73 लाख 59 हजार
सोने – 1 कोटी 56 लाख
चांदी – 55 लाख
वाहने – 6 कोटी एकोणीस लाख 46 हजार 430 रुपये
शेती – 122 कोटी 88 लाख 59 हजार
ठेवी – 29 कोटी 74 लाख
शेअर्स गुंतवणूक – 108 कोटी

पत्नी याज्ञसेनी महाराणी यांच्याकडे 3 कोटी 76 लाख रुपये किमतीचे सोने आणि 17 लाख रुपयांची चांदी आहे.. तर शाहू महाराज यांनी शेतीबरोबरच विविध कंपन्यांचे शेअर्स आणि शेत जमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला वारसा हक्काने मिळालेल्या न्यू पॅलेस, फैजेवाडी येथील वाडा यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यात 1949 च्या विंटेज मे बॅक या मेड टू ऑर्डर या वाहनाचा समावेश असून त्याचे आजचे बाजार मूल्य 5 कोटी आहे…

दरम्यान शाहू महाराज यांच्या विरोधात उभे असलेले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या संपत्तीवर ही एक नजर टाकूया…

शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार(presidential candidates) संजय मंडलिक यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात तब्बल साडेपाच कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 14 कोटी 37 लाख 27 हजार इतकी आहे. तर व्यवसायाने शेतकरी असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती विवरणपत्र जोडले आहे. आता हे झाले कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांच्या संपत्तीबाबत, मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार देखील कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे.

हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत विवरणपत्र जोडले आहे. त्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता 4 कोटी 45 लाख 71 हजार 828 रुपये इतकी आहे. परंतु 2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत सुमारे 30 लाखांनी घट झालेली आहे. खासदार माने यांची स्थावर मालमत्ता 3 कोटी 58 लाखांची आहे. तर जंगम मालमत्ता 87 लाख 60 हजार 828 रुपयांची आहे. त्यांच्यावर दोन कोटी 19 लाख 75 हजार 327 रुपयांचा कर्ज आहे. सोन्याचे दागिने सुमारे 7 लाख 12 हजारांचे आहेत.

तर शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी(presidential candidates) यांनी चळवळीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करत जिल्हा परिषदेवर निवडून गेले. यानंतर सुरू झालेला राजकीय प्रवास हा शिरोळचे एक टर्म आमदार आणि हातकणंगलेचे दोन वेळा खासदार असा राहिला. त्यांना एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे. तर आता चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत..

राजू शेट्टी यांनी 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या संपत्ती विवरण पत्रामध्ये आपली संपत्ती एकूण मालमत्ता दोन कोटी 36 लाख 47 हजार 333 रुपये दाखवली होती 2024 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सुपर सादर केलेल्या संपत्तीच्या विवरण पत्रामध्ये दोन कोटी 81 लाख 34 हजार 866 रुपये मालमत्ता मूल्य असल्याचे नमूद केलं आहे. सन 2019 मध्ये राजू शेट्टी यांच्यावर केवळ सात लाख 74 हजार इतके कर्ज होते त्यामध्ये आता एक कोटी 41 लाखाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या संपत्तीत 45 लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते तर संपत्ती बरोबर त्यांच्या कर्जातही एक कोटी 41 लाखाने वाढ झालेली आहे.

दरम्यान कोल्हापूरकरांचा नेहमीच विषय हार्ड असतो म्हटले जाते. त्याप्रमाणे कोल्हापुरात उभे असलेल्या नेत्यांची संपत्ती देखील विषय हार्ड आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघातून सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आता प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे… यामुळे या कोट्यधीश उमेदवारांनी कोल्हापूरकरांसमोर मतांसाठी हात पसरले असून कोल्हापूरकर आपला मत नेमकं कोणाला देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे….

हेही वाचा :

सांगलीची जागा देणे चुकीचेच, कारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही.. विश्वजित कदम कडाडले!

आमच्या भावना समजून घ्या…, सांगलीच्या काँग्रेस मेळाव्यात विशाल पाटील समर्थकांनी घातला गोंधळ

“तीन जागांसाठी तीन महिने गेले त्यात सांगली,…”; विश्वजित कदमांच्या रुद्रावतारावर बाळासाहेब थोरातांचा शांत उतारा!