शहरातील एका दुर्दैवी घटनेत अकरा महिन्याच्या बालकाचा घरासमोरील (spread)गटारीत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी नगरपालिकेच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बालक आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक गटारीत पडला. बालकाच्या कुटुंबीयांनी तात्काळ त्याला गटारीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
गटारीच्या खराब स्थितीबद्दल परिसरातील(spread) नागरिकांनी नगरपालिकेवर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, या गटारीची वेळोवेळी साफसफाई होत नाही आणि त्यामुळे ती खूपच धोकादायक झाली आहे. नागरिकांनी या दुर्घटनेनंतर गटारीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
नगरपालिकेने या घटनेची तात्काळ दखल घेतली (spread)आहे आणि गटारींची तपासणी व दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा :
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका नव्या वळणावर
लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप
सावधान! पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट तर…