लाडकी बहीण योजना ही नेहमी चर्चेत असते.(taxes)लाडकी बहीण योजनेवरुन अनेकदा विरोधी पक्षनेते आरोप करत असतात. नेहमी लाडकी बहीण योजनेचा हप्ता यायला उशिर होत असल्याने महिलांनाही त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवर महायुतीच्या नेत्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.काल मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं की, लाडकी बहीण योजनेमुळे निधी यायला उशिर होतंय. त्यावर आता छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.यात लपवण्यासारखे काही नाही . यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल.

छगन भुजबळांनी दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडले आहे. शंभर टक्के मलाही वाटते आणि कोणालाही वाटणार.लाडक्या बहिणीसाठी शिल्लक पडलेला निधी नव्हता सरकारकडे.जोपर्यंत नीट घडी बसत नाही तोपर्यंत हे होणार. पूर्ववत घडी कशी बसणार यासाठी प्रयत्न करत आहे .(taxes)लाडकी बहीण, शिव भोजन थाळी याचे देखील पैशांना उशीर होत आहे .पैसे कुठेही जाणार नाही सर्वांना ते पैसे मिळणार .कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारने ठरवायचे असते.
लाडक्या बहिणाबाईंना पैसे मिळतंय,मात्र लाडक्या भावांचे अनुदान अद्याप मिळाले नाही.त्यांना पण पैसे मिळतील.ज्या प्रमाणे एखाद्या मोठ्या घरात खर्च वाढतो त्यावेळी नेहमीचे खर्च मागेपुढे आपण करतो,सगळ्यांना पैसे मिळणार.शेवटी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाच्या घरातच जातात ना,लाडक्या बहिणी थोडी सगळे पैसे खर्च करत असतात.लाडक्या बहिणीचा भार सरकारी तिजोरीवर पडला हे खरे आहे त्यात लपवण्यासारखे काय,असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्याचे उत्पन्न वाढविण्याच्या पॉलिसी आहेत. राज्याच्या विविध योजनांचा खर्च वाढत आहे.सरकार आपल्याकडूनच टॅक्स गोळा करतो.मागील वर्षा पासून खर्च वाढला आहे हातमिळवणी करावी लागणार आहे.(taxes)खर्च वाढत असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागतील.सारथी,बार्टी,लाडकी बहीण या योजनांचा खर्च होतोय.त्यासाठी इन्कम तर वाढवावा लागेल.अजित दादा त्या खात्याचे मंत्री आहे,जास्तीत जस्त पैसे गोळा करणे आणि ते खर्चायला देणे हे त्यांचे काम आहे.
हेही वाचा :
चिंतनीय घटना घडल्या दोन; सांगा, त्याला जबाबदार कोण?
पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू
सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral