कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हद्दपार, तडीपार हे शब्द गुंडांशी, गुंडगिरीची(politics) संबंधित आहेत, त्याच क्षेत्राशी प्रचलित आहेत. सामान्य माणूस हे शब्द ऐकतो पण सहसा त्याच्या तोंडी हे शब्द येत नाहीत. पण गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते यांच्याकडून तडीपार या शब्दाचा वारंवार वापर होऊ लागला आहे. राजकारण अगदी निकष पातळीवर पोहोचल्याने भाषा सभ्यता, भाषा सौजन्य घसरले आहे.
भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी टीका शरद पवार यांच्यावर करणाऱ्या(politics) अमित शहा यांना गुजरात मधून तडीपार करण्यात आले होते असा घनाघात पवार यांनी केला आहे. आता तडीपार शब्दावरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप यांच्यात शब्दाने शब्द वाढत चाललेला आहे.
भ्रष्टाचारी मंडळींचे सरदार अशी अमित शहा यांनी पुण्यात येऊन शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही अतिशय धारदार आणि जिव्हारी लागणारी असल्याने पवार गटातून संतप्त प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. शरद पवार हे शरद पवार हे भाषा सभ्यता पाळणारे नेते असूनही त्यांनी अमित शहा यांच्यासाठी तडीपार हा शब्द वापरला आहे. त्यांना गुजरात मधून तडीपार करण्यात आले होते अशी भाजप नेत्यांना पोहोचणारी टीका त्यांनी केली तेव्हा सुधीर मनगंटीवार म्हणाले की शरद पवारांची सत्तेची स्वप्ने तडीपार झाली आहेत. तर शरद पवार हे वैफल्यग्रस्त नेते आहेत. अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
तडीपार या शब्दाची पहिली रचना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. भाजपाच्या “अब की बार 400 पार” या घोषणेतील हवा काढून घेण्यासाठी “आबकी बार भाजपा तडीपार”ही घोषणा पुढे आणली होती. तडीपार या शब्दावरून दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. थोड्या फार फरकाने उद्धव ठाकरे यांची घोषणा महाराष्ट्रात खरी सुद्धा ठरली.
तथापि गुंडांसाठी, गुंडगिरीसाठी वापरली जाणारी भाषा त्यांनी राजकारणात(politics) आणली. आता राष्ट्रवादी आणि भाजप सुद्धा अशीच भाषा वापरतो आहे. त्यामुळे या शब्दाची दहाहकता वाढली आहे की कमी झाली आहे हेच कळेनासे झाले आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहाल आणि बोचरी टीका करण्यासाठी खासदार संजय राऊत यांना नेमस्त केले आहे तर त्यांच्यावर जशास तशा भाषेत उत्तर देण्यासाठी भाजपाने आमदार नितेश राणे यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे. दोघांच्या कडून भाषा सभ्यतेची ऐशी तैशी केली जाते. राऊत यांनी फडणवीस यांना पावसाळी छत्री म्हटल्यावर नितेश राणे म्हणाले राऊत हे पावसाळी गमबूट आहेत. लायकी नसलेला माणूस, त्याच्याबद्दल काय बोलायचे असे फडणवीस राऊत यांच्याविषयी नेहमी व्यक्त होत असतात.
आंब्याचा सिझन असो किंवा नसो. पण सामान्य माणसाकडून “नासका आंबा” हा बोली भाषेत वापरला जाणारा शब्द. पण हाच शब्द ज्येष्ठ नेत्यांनी विचारला की त्याची दाहकता वाढते. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित दादा गटात गेलेले बाबाजानी दुरानी यांनी पुन्हा घर वापसी केली तेव्हा आता आम्ही माणसांना पारखून पक्षात घेणार आहोत. कारण एक आंबा नासका निघाला के आंब्याची अढीच नासते. आढीतील सर्वच आंबे नासतात. असे विधान अजितदादा यांचे नाव न घेता त्यांनी केले. त्यावरही आता चर्चा सुरू झाली असून प्रफुल्ल पटेल यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील हे तसे फटकळ आहेत. छगन भुजबळ हा जेलमध्ये जाऊन आलेला माणूस. त्याची औकात काय? अशीच भाषा त्यांनी सतत वापरली आहे. तर सासऱ्याच्या तुकड्यावर जगणारा असा शब्दप्रयोग भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या विषयी केला आहे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलतानाही जहाल भाषा वापरली आहे. त्यानंतर जरांगे पाटील हा भंपक माणूस आहे, मानसिक संतुलन गमावून बसलेला वेडा माणूस आहे. अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी त्यांना फटकारले आहे.
आपण करत असलेली टीका समोरच्या माणसाला घायाळ करणारी असली पाहिजे अशा मानसिकतेत असलेल्या राजकारण्यांनी गल्लीबोळातील टपोरी पोरे बोलतात तशी भाषा समोरच्यावर टीका करण्यासाठी निवडलेली आहे. म्हणूनच की काय, भाषा सभ्यता, भाषा सौजन्य, भाषा सौंदर्य, भाषा सौष्ठव, भाषा अविष्कार असे भाषेचे अलंकार तडीपार झालेले आहेत.
हेही वाचा :
हसतं-खेळतं नातं तोडू शकतात तुमच्या ‘या’ चुका, ब्रेकअपची कारणं समजून घ्या..
पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचाने कमी, पाऊसही ओसरला
6000 कोटी रुपयांचा आयपीओ येणार, मालामाल होण्याची ‘ही’ संधी सोडू नका!